YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 9:14-29

मार्क 9:14-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर ते शिष्यांजवळ आले, तेव्हा त्यांना त्यांच्याभोवती मोठा लोकसमुदाय आहे आणि नियमशास्त्राचे शिक्षक त्याच्याशी वाद करत आहेत असे त्यांना दिसले. सर्व लोक येशूला पाहताच आश्चर्यचकित झाले आणि ते त्याचे स्वागत करण्यासाठी धावले. येशूने शिष्यांना विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कसला वाद घालीत आहात?” तेव्हा समुदायातील एकाने त्यास उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे आणले. त्यास दुष्ट आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही. आणि जेव्हा तो त्यास धरतो तेव्हा त्यास खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्यास काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.” येशू त्यांना म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? मी तुमच्याबरोबर कोठवर सहन करू? मुलाला इकडे आणा.” नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणले आणि जेव्हा त्या दुष्ट आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “किती काळ हा असा आहे?” वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे. पुष्कळदा ठार करण्यासाठी त्याने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा.” येशू त्यास म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.” तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, “मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका.” येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावत येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या दुष्ट आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको.” नंतर तो ओरडून व त्यास अगदी पिळून बाहेर निघाला व मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांस वाटले, तो मरण पावला. परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो उभा राहिला. नंतर येशू घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्यास एकांतात विचारले, “आम्ही तो अशुद्ध आत्मा का काढू शकलो नाही?” येशू त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही निघणे शक्य नाही.”

सामायिक करा
मार्क 9 वाचा

मार्क 9:14-29 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा ते बाकीच्या शिष्यांकडे आले, तेव्हा त्यांच्याभोवती मोठा समुदाय होता आणि काही नियमशास्त्र शिक्षक त्यांच्याशी वाद घालत आहेत, असे त्यांना दिसले. येशूंना पाहून सर्व समुदायाला आश्चर्य वाटले आणि त्यांचे अभिवादन करण्यास ते धावत गेले. येशूंनी विचारले, “तुम्ही त्यांच्याशी कशाविषयी वाद करीत होता?” गर्दीतील एक मनुष्य उत्तरला, “गुरुजी, मी माझ्या मुलाला तुमच्याकडे घेऊन आलो, त्याला दुरात्म्याने पछाडलेले आहे व त्याने त्याची वाणी हिरावून घेतली आहे; ज्यावेळी दुरात्मा त्याला ताब्यात घेतो, तेव्हा तो त्याला जमिनीवर आपटतो. त्याच्या तोंडाला फेस येतो, क्रोधाने दात खातो आणि त्याचे शरीर ताठ होते. त्या दुरात्म्याला हाकलून लावण्याची आपल्या शिष्यांना विनंती केली, पण ते करू शकले नाहीत.” येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन पिढी, आणखी किती काळ मी तुमच्याबरोबर राहिले पाहिजे? आणखी किती काळ मी तुमचे सहन करू? मुलाला माझ्याकडे आणा.” त्याप्रमाणे ते मुलाला घेऊन आले. पण दुरात्म्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्याने त्या मुलाला झटके आणले आणि तो मुलगा जमिनीवर पडून लोळू लागला व त्याच्या तोंडामधून फेस येऊ लागला. “हा केव्हापासून असा आहे?” येशूंनी त्याच्या वडिलांना विचारले. वडिलांनी उत्तर दिले, “अगदी बालपणापासून, त्याने मुलाला अनेकदा जिवे मारण्याकरिता विस्तवात, नाही तर पाण्यात फेकून दिले आहे. परंतु तुम्ही काही करू शकत असाल तर आमच्यावर दया करा आणि आम्हाला मदत करा.” “जर तुम्हाला शक्य असेल?” येशू म्हणाले, “जो विश्वास ठेवतो त्याला सर्वकाही शक्य आहे.” मुलाच्या वडिलांनी झटकन उत्तर दिले, “मी विश्वास ठेवतो, माझा अविश्वास दूर करण्यास मला साहाय्य करा!” हे पाहण्याकरिता लोक धावत तेथे येत आहेत, हे पाहून येशूंनी दुरात्म्याला धमकावून म्हटले, “अरे बहिरेपणाच्या व मुकेपणाच्या आत्म्या, या मुलामधून बाहेर येण्याची मी तुला आज्ञा करीत आहे आणि पुन्हा कधीही त्याच्यामध्ये प्रवेश करू नकोस.” हे ऐकून दुरात्म्याने किंकाळी फोडली, व त्याला पिळून बाहेर निघून गेला. मुलगा मेल्यासारखा पडला होता. “तो मरण पावला आहे,” असे लोक म्हणू लागले. परंतु येशूंनी मुलाचा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि तो उभा राहिला. नंतर येशू आत गेल्यानंतर, शिष्यांनी खाजगी रीतीने विचारले, “त्याला आम्ही का काढू शकलो नाही?” त्याने उत्तर दिले, “असा प्रकार फक्त प्रार्थनेद्वारेच निघू शकतो.”

सामायिक करा
मार्क 9 वाचा

मार्क 9:14-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर ते शिष्यांजवळ आले तेव्हा त्यांच्याभोवती लोकसमुदाय आहे व त्यांच्याबरोबर शास्त्री वादविवाद करत आहेत असे त्यांना दिसून आले. त्याला पाहताच सर्व लोक अगदी आश्‍चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला प्रणाम केला. त्याने त्यांना विचारले, “ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे?” तेव्हा समुदायातील एकाने उत्तर दिले, “गुरूजी, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो. ह्याला मुका आत्मा लागला आहे. तो जेथे जेथे ह्याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो, मग हा तोंडाला फेस आणून कडकडा दात खातो व निपचित पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतु त्यांना तो काढता येईना.” ह्यावर तो म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हांला वागवून घेणार? त्याला माझ्याकडे आणा.” त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. तेव्हा त्याने त्याच्या बापाला विचारले, “ह्याला असे होऊन किती काळ लोटला?” तो म्हणाला, “बाळपणापासून. ह्याचा नाश करावा म्हणून त्याने ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले; पण आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आमच्यावर दया करा व आम्हांला साहाय्य करा.” येशू त्याला म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणार्‍याला सर्वकाही शक्य आहे.” लगेचच मुलाचा बाप [डोळ्यांत आसवे आणून] मोठ्याने म्हणाला, “प्रभूजी, माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालवून टाका.” तेव्हा लोक धावत येत आहेत असे पाहून येशू अशुद्ध आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्याबहिर्‍या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नकोस.” तेव्हा तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला, आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले. पण येशूने त्याला हाताला धरून उठवले व तो उभा राहिला. मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला एकान्तात विचारले, “आम्हांला तो का काढता आला नाही?” तो त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून1 दुसर्‍या कशानेही निघणारी नाही.”

सामायिक करा
मार्क 9 वाचा

मार्क 9:14-29 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ते इतर शिष्यांजवळ आले, तेव्हा त्यांच्याभोवती लोकसमुदाय आहे व त्यांच्याबरोबर काही शास्त्री वादविवाद करत आहेत, असे त्यांना दिसून आले. येशूला पाहताच सर्व लोक अगदी आश्‍चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे धावत जाऊन त्यांनी त्याला नमन केले. त्याने शिष्यांना विचारले, “ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे?” लोकसमुदायातील एकाने उत्तर दिले, “गुरुवर्य, मी माझ्या मुलाला आपल्याकडे घेऊन आलो आहे. ह्याला भुताने पछाडले आहे व हा बोलू शकत नाही. जेथे जेथे ते ह्याला धरते, तेथे तेथे ते ह्याला खाली आपटते. मग ह्याच्या तोंडाला फेस येतो आणि हा दात खातो व त्याचे सर्व अंग ताठ होते. ह्याच्यातील भुताला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी विनंती केली, परंतु त्यांना ते काढता आले नाही.” येशू म्हणाला, “अहो विश्वासहीन लोकांनो, मी कुठवर तुमच्याबरोबर असणार? कोठवर तुम्हांला समजून घेणार? त्याला माझ्याकडे आणा.” त्यांनी त्याला त्याच्याकडे आणले. त्या भुताने येशूला पाहताच मुलाला पिळवटून टाकले आणि तो मुलगा जमिनीवर पडून तोंडाला फेस येऊन लोळू लागला. येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “ह्याला असे कधीपासून होत आहे?” ते म्हणाले, “बालपणापासून. ह्याचा नाश करावा म्हणून भुताने ह्याला पुष्कळदा अग्नीत व पाण्यात टाकले. आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हांवर दया करा व आम्हांला साहाय्य करा.” येशू त्यांना म्हणाला, “हो, जर तू स्वतः विश्वास ठेवलास तर. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे.” लगेच मुलाचे वडील मोठ्याने म्हणाले, “माझा विश्वास आहे, पण माझा अविश्वास दूर करण्याकरता मला साहाय्य करा.” लोक सभोवती गर्दी करीत आहेत, असे पाहून येशू त्या भुताला म्हणाला, “अरे मुक्याबहिऱ्या भुता, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नकोस.” त्या भुताने किंकाळी फोडली व मुलाला जोरदार झटका देऊन खाली फेकले व ते त्याच्यातून निघाले. तो मुलगा मेल्यासारखा झाला. “तो मेला आहे”, असे सर्व जण म्हणू लागले. परंतु येशूने त्याला हात धरून उठवले व तो उभा राहिला. येशू घरी गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला खाजगीत विचारले, “आम्हांला ते का काढता आले नाही?” तो त्यांना म्हणाला, “ह्या प्रकारचे भूत केवळ प्रार्थनेने काढणे शक्य असते.”

सामायिक करा
मार्क 9 वाचा