YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 6:45-52

मार्क 6:45-52 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही तारवात बसून पलीकडे बेथसैदा येथे जा, असे सांगून येशूने लगेचच शिष्यांना त्याच्यापुढे जाण्यास सांगितले. लोकांस निरोप देऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. संध्याकाळ झाली तेव्हा तारू सरोवराच्या मध्यभागी होता आणि येशू एकटाच जमिनीवर होता. मग त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. नंतर पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू सरोवरावरून चालत त्यांच्याकडे आला, त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. पण त्यास सरोवरातील पाण्यावरून चालतांना पाहिले, तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले. कारण त्या सर्वांनी त्यास पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भिऊ नका, मी आहे.” नंतर तो त्यांच्याकडे तारवात गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले. कारण त्यांना भाकरीची गोष्ट समजली नव्हती आणि त्यांची मने कठीण झाली होती.

सामायिक करा
मार्क 6 वाचा

मार्क 6:45-52 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पलीकडे असलेल्या बेथसैदा या ठिकाणी त्यांच्यापुढे जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले. त्यांना निरोप दिल्यानंतर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले. रात्र झाली, तेव्हा होडी सरोवराच्या मध्यावर गेली होती आणि ते एकटेच जमिनीवर होते. तेथून त्यांनी आपल्या शिष्यांना वल्ही मारणे कठीण जात आहे असे पाहिले, कारण वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत होता. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. ते त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागले, परंतु त्यांनी येशूंना सरोवरावरून चालत जाताना पाहिले, तेव्हा ते भूतच असले पाहिजे असे त्यांना वाटले व ते ओरडले, कारण त्या सर्वांनीच त्यांना पाहिले आणि ते फार घाबरले. पण तत्काळ येशू त्यांना म्हणाले, “धीर धरा, मी आहे! भिऊ नका.” मग ते होडीत चढले आणि वादळ शांत झाले. शिष्य आश्चर्याने थक्क झाले. कारण भाकरी संबंधात त्यांना समजले नव्हते आणि त्यांची हृदये कठीण झाली होती.

सामायिक करा
मार्क 6 वाचा

मार्क 6:45-52 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर, ‘मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही मचव्यात बसून पलीकडे बेथसैदा येथे जा,’ असे सांगून त्याने लगेचच शिष्यांना लावून दिले. मग लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. आणि रात्र झाली तेव्हा तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो (येशू) एकटाच जमिनीवर होता. त्याला ते वल्ही मारता मारता हैराण झालेले दिसले कारण वारा तोंडचा होता. नंतर रात्री चौथ्या प्रहराच्या सुमारास तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता; पण त्याला समुद्रावरून चालताना पाहून, हे भूत आहे असे त्यांना वाटले व ते ओरडले; कारण त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तेव्हा तो लगेच त्यांच्याबरोबर बोलू लागला व त्यांना म्हणाला, “धीर धरा; मी आहे; भिऊ नका.” आणि तो त्यांच्याकडे मचव्यात चढून गेला; तेव्हा वारा पडला; मग ते मनातल्या मनात फारच आश्‍चर्यचकित झाले. कारण भाकरींची गोष्ट त्यांना उमगली नव्हती, त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते.

सामायिक करा
मार्क 6 वाचा

मार्क 6:45-52 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

‘मी लोकसमुदायाला निरोप देतो. तुम्ही मचव्यातून सरोवरापलीकडे बेथसैदा येथे जा’, असे सांगून त्याने लगेच शिष्यांना पुढे पाठवले. लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. सायंकाळ झाली, तेव्हा तो मचवा सरोवरात होता व येशू एकटाच जमिनीवर होता. शिष्य वल्ही मारतामारता हैराण झालेले त्याने पाहिले, कारण वारा विरुद्ध दिशेने वाहत होता. भल्या पहाटेस तीन ते सहाच्या दरम्यान येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आला. त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा रोख होता. त्याला जलाशयावरून चालताना पाहून, हे भूत आहे, असे त्यांना वाटले व ते ओरडले. त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, मी आहे, भिऊ नका.” तो त्यांच्याबरोबर मचव्यात चढला आणि वारा पडला. ते मनातल्या मनात खूपच आश्‍चर्यचकित झाले; कारण भाकरींविषयी त्यांना काही समजले नाही, अथवा खरे म्हणजे त्यांची अंतःकरणे कठीण झाली होती.

सामायिक करा
मार्क 6 वाचा