मार्क 15:33-41
मार्क 15:33-41 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एलोई, एलोई, लमा सबक्थनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” तेव्हा जवळ उभे राहणार्यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणू लागले, “पाहा, तो एलीयाला हाक मारतो आहे.” आणि कोणीएकाने धावत जाऊन स्पंज ‘आंबेने’ भरला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला ‘चोखण्यास दिला’, आणि म्हटले, “असू द्या, एलीया ह्याला खाली उतरवायला येतो की काय हे पाहू.” मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. तेव्हा पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडला हे त्याच्यासमोर जवळच उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून म्हटले, “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.” काही स्त्रियांही दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरीया व सलोमे ह्या होत्या; तो गालीलात असताना ह्या त्याच्याबरोबर जात व त्याची सेवा करत असत; ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमेस आलेल्या दुसर्या पुष्कळ स्त्रिया होत्या.
मार्क 15:33-41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुपारची वेळ झाली. सगळ्या देशभर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला. मग तीन वाजता येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकथनी, म्हणजे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” जवळ उभे असलेल्या काहीजणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, ऐका, तो एलीयाला बोलवत आहे. एकजण धावत गेला. त्याने स्पंज आंबेत बुडवून भरला. वेताच्या काठीवर ठेवला व तो येशूला पिण्यास दिला आणि म्हणाला, थांबा! एलीया येऊन त्यास खाली उतरवायला येतो की काय हे आपण पाहू. मग मोठ्याने आरोळी मारून येशूने प्राण सोडला. तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले. येशूच्या पुढे उभे आलेल्या अधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता. तेथे असलेल्या काही स्त्रिया दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया व सलोमी या होत्या. येशू जेव्हा गालील प्रांतात होता तेव्हा या स्त्रिया त्याच्यामागे जात व त्याची सेवा करीत असत. याशिवाय त्याच्याबरोबर यरूशलेम शहरापर्यंत आलेल्या इतर अनेक स्त्रियाही होत्या.
मार्क 15:33-41 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
संपूर्ण देशावर दुपारच्या तीन वाजेपर्यंत अंधार पडला. आणि दुपारी तीन वाजता, येशूंनी मोठ्याने आरोळी मारली, “एलोई, एलोई, लमा सबकतनी,” म्हणजे “माझ्या परमेश्वरा माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा त्याग का केला?” तिथे जवळ उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले व ते म्हणाले, “पाहा, तो एलीयाहला बोलावित आहे.” कोणी एक धावला, शिरक्यात भिजविलेला, एक स्पंज काठीवर ठेवून येशूंना प्यावयास दिला व तो म्हणाला, “त्याला एकटे सोडा. एलीयाह त्याला खाली उतरविण्यास येतो की काय, हे आपण पाहू!” मग येशूंनी मोठी आरोळी मारून, शेवटचा श्वास घेतला. तेव्हा मंदिराच्या पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला. जेव्हा येशूंच्या समोर उभे असलेल्या शताधिपतीने ते कसे मरण पावले हे पाहिले, तेव्हा तो म्हणाला, “खरोखरच हा मनुष्य परमेश्वराचा पुत्र होता!” अनेक स्त्रिया हे दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मरीया मग्दालिया, धाकटा याकोब व योसेफ यांची आई मरीया, सलोमी होत्या. गालीलामध्ये असताना या स्त्रिया येशूंना अनुसरून त्यांची सेवा करीत असत. यरुशलेममधून त्यांच्याबरोबर आलेल्या इतर अनेक स्त्रियाही तिथे होत्या.
मार्क 15:33-41 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एलोई, एलोई, लमा सबक्थनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” तेव्हा जवळ उभे राहणार्यांपैकी कित्येक जण हे ऐकून म्हणू लागले, “पाहा, तो एलीयाला हाक मारतो आहे.” आणि कोणीएकाने धावत जाऊन स्पंज ‘आंबेने’ भरला आणि बोरूच्या टोकावर ठेवून त्याला ‘चोखण्यास दिला’, आणि म्हटले, “असू द्या, एलीया ह्याला खाली उतरवायला येतो की काय हे पाहू.” मग येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. तेव्हा पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडला हे त्याच्यासमोर जवळच उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून म्हटले, “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.” काही स्त्रियांही दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरीया व सलोमे ह्या होत्या; तो गालीलात असताना ह्या त्याच्याबरोबर जात व त्याची सेवा करत असत; ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमेस आलेल्या दुसर्या पुष्कळ स्त्रिया होत्या.
मार्क 15:33-41 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मध्यान्हीच्या वेळी देशभर तीन तास अंधार पडला. दुपारी तीन वाजता येशू आक्रोश करीत म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी?” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” हे ऐकून जवळ उभे राहणाऱ्यांपैंकी कित्येक जण म्हणू लागले, “पाहा, तो एलियाला हाक मारत आहे.” त्यांच्यापैकी एकाने धावत जाऊन आंबेत भिजवलेला स्पंज एका काठीच्या टोकावर ठेवून त्याला चोखायला दिला आणि म्हटले, “थांबा! एलिया त्याला क्रुसावरून खाली उतरून घ्यायला येतो की काय हे पाहू!” येशूने मोठ्याने आरोळी मारून प्राण सोडला. त्या वेळी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. येशूने अशा प्रकारे प्राण सोडला, हे पाहून क्रुसासमोर उभ्या असलेल्या सैन्याधिकाऱ्याने म्हटले, “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता.” काही महिलादेखील दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालिया मरिया, धाकटा याकोब व योसे ह्यांची आई मरिया व सलोमे ह्या होत्या. तो गालीलमध्ये असताना ह्या त्याच्याबरोबर फिरून त्याची सेवा करत असत. ह्यांच्याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमहून आलेल्या दुसऱ्या पुष्कळ स्त्रियादेखील होत्या.