YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 15:33-41

मार्क 15:33-41 IRVMAR

दुपारची वेळ झाली. सगळ्या देशभर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला. मग तीन वाजता येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबकथनी, म्हणजे, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?” जवळ उभे असलेल्या काहीजणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, ऐका, तो एलीयाला बोलवत आहे. एकजण धावत गेला. त्याने स्पंज आंबेत बुडवून भरला. वेताच्या काठीवर ठेवला व तो येशूला पिण्यास दिला आणि म्हणाला, थांबा! एलीया येऊन त्यास खाली उतरवायला येतो की काय हे आपण पाहू. मग मोठ्याने आरोळी मारून येशूने प्राण सोडला. तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले. येशूच्या पुढे उभे आलेल्या अधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता. तेथे असलेल्या काही स्त्रिया दुरून पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मग्दालीया नगराची मरीया, याकोब व योसेफ यांची आई मरीया व सलोमी या होत्या. येशू जेव्हा गालील प्रांतात होता तेव्हा या स्त्रिया त्याच्यामागे जात व त्याची सेवा करीत असत. याशिवाय त्याच्याबरोबर यरूशलेम शहरापर्यंत आलेल्या इतर अनेक स्त्रियाही होत्या.