मार्क 1:35-38
मार्क 1:35-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते, व तो सापडल्यावर ते त्यास म्हणाले, गुरूजी “आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहोत.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे.”
मार्क 1:35-38 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अगदी पहाटेस, अंधार असताना, ते उठले आणि घर सोडून एकांतस्थळी गेले आणि तेथे त्यांनी प्रार्थना केली. शिमोन व त्याचे सोबती त्यांना शोधीत तेथे गेले. ते सापडल्यावर ते त्यांना म्हणाले, “प्रत्येकजण तुमचा शोध करीत आहे!” येशूंनी म्हटले, “आपण दुसरीकडे कोठेतरी आसपासच्या खेड्यात जाऊ म्हणजे मला तेथे प्रवचन देता येईल कारण त्यासाठीच मी आलो आहे.”
मार्क 1:35-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली. तेव्हा शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध करत गेले, व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध करत आहेत.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मला आसपासच्या गावांत उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ; कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे.”
मार्क 1:35-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेस उठून येशू नगराबाहेर एकांतात गेला व तेथे तो प्रार्थना करू लागला. परंतु शिमोन व त्याचे सोबती त्याचा शोध घेऊ लागले. तो भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध घेत आहेत.” परंतु तो त्यांना म्हणाला, “आपण आसपासच्या गावांत जायला हवे. मला तेथेही प्रबोधन केले पाहिजे कारण ह्याच उद्देशाने मी आलो आहे.”