मार्क 1:14-18
मार्क 1:14-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली. तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.” येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.” मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.
मार्क 1:14-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योहानाला बंदीत टाकल्यानंतर, परमेश्वराच्या शुभवार्तेची घोषणा करीत येशू गालील प्रांतात आले. ते म्हणाले, “वेळ आली आहे,” व “परमेश्वराचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवार्तेवर विश्वास ठेवा!” एके दिवशी येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना सरोवरात जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाले, “चला, माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” हे ऐकताच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.
मार्क 1:14-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या [राज्याची] सुवार्ता गाजवत गालीलात आला व म्हणाला, “काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे; पश्चात्ताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.” नंतर गालील समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन.” मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले.
मार्क 1:14-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या शुभवर्तमानाची घोषणा करीत गालीलमध्ये आला व म्हणाला, “काळाची परिपूर्ती झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा व शुभवर्तमानावर विश्वास ठेवा.” एकदा गालील सरोवराजवळून जात असताना येशूला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते कोळी होते. येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” ते लगेच त्यांची जाळी सोडून येशूच्या मागे निघाले.