YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 5:1-12

मत्तय 5:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला, व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. “जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. ‘जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ ‘जे सौम्य’ ते धन्य, कारण ‘ते पृथ्वीचे वतन भोगतील.’ जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. ‘जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.

सामायिक करा
मत्तय 5 वाचा

मत्तय 5:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जेव्हा येशूने त्या लोकसमुदायांना पाहीले तेव्हा तो डोंगरावर चढला, मग तो तेथे खाली बसला असता त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. त्याने आपले तोंड उघडले व त्यांना शिकवले. तो म्हणाला; “जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. ‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ ‘जे सौम्य’ ते धन्य आहेत, कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’ जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील. जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे, कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला.

सामायिक करा
मत्तय 5 वाचा

मत्तय 5:1-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

लोकांची गर्दी पाहून, येशू टेकडीवर गेले आणि तेथे बसले. त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले. मग ते त्यांना शिकवू लागले. ते म्हणाले: “धन्य ते, जे आत्म्याने नम्र आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. धन्य ते, जे शोकग्रस्त आहेत, कारण त्यांना सांत्वन मिळेल. धन्य ते, जे सौम्य आहेत, कारण ते पृथ्वीचे वतनाधिकारी होतील. ज्यांना नीतिमत्वाची तहान व भूक लागली आहे ते धन्य कारण ते तृप्त केले जातील. धन्य ते, जे दयाळू आहेत, कारण त्यांना दयाळूपणाने वागविले जाईल. धन्य ते, जे शुद्ध हृदयाचे आहेत, कारण त्यांना परमेश्वराचे दर्शन घडेल. धन्य ते, जे शांती प्रस्थापित करतात, कारण ते परमेश्वराचे लोक म्हणून ओळखण्यात येतील. धन्य ते, ज्यांचा नीतिमत्वासाठी छळ करण्यात येतो, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. “माझे अनुयायी असल्या कारणाने लोक तुमची निंदा, तुमचा अपमान व छळ करतील व तुमच्याविरुद्ध सर्वप्रकारच्या गोष्टी लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. त्यामुळे तुम्ही आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे, त्यांनी प्राचीन काळाच्या संदेष्ट्यांनाही असेच छळले होते.

सामायिक करा
मत्तय 5 वाचा

मत्तय 5:1-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

लोकसमुदायाला पाहून येशू एका डोंगरावर चढला. तेथे खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. तेव्हा तो त्यांना शिकवू लागला. “जे आत्म्याने दीन आहेत ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल. जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. ज्यांना नीतिमत्त्वाची भूक व तहान लागलेली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांना दया मिळेल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती प्रस्थापित करण्यासाठी झटतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल. नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे खोटे आरोप करतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा. उल्हास करा; कारण स्वर्गात तुमचे पारितोषिक महान आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असाच छळ केला.

सामायिक करा
मत्तय 5 वाचा