YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 5:1-12

मत्तय 5:1-12 MACLBSI

लोकसमुदायाला पाहून येशू एका डोंगरावर चढला. तेथे खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. तेव्हा तो त्यांना शिकवू लागला. “जे आत्म्याने दीन आहेत ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल. जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. ज्यांना नीतिमत्त्वाची भूक व तहान लागलेली आहे ते धन्य, कारण ते तृप्त होतील. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांना दया मिळेल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती प्रस्थापित करण्यासाठी झटतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल. नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे खोटे आरोप करतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा. उल्हास करा; कारण स्वर्गात तुमचे पारितोषिक महान आहे. तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही त्यांनी असाच छळ केला.