YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 4:18-21

मत्तय 4:18-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशू गालील सरोवराच्या जवळून चालत असताना, त्यांनी शिमोन ज्याचे नाव पेत्र असेही होते आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांना पाहिले. ते सरोवरात जाळे टाकीत होते, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाले, “चला माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करेन.” लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले. किनार्‍यावरून पुढे गेल्यावर त्यांनी आणखी दोन भाऊ, म्हणजे जब्दीचे पुत्र, याकोब आणि त्याचा भाऊ योहानला पाहिले. ते आपल्या वडिलांसह होडीत बसून आपली जाळी तयार करत होते. येशूंनी त्यांनाही हाक मारून बोलाविले

सामायिक करा
मत्तय 4 वाचा