नंतर गालील समुद्राजवळून येशू चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया ह्या दोघा भावांना समुद्रात पाग टाकताना पाहिले; कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले, आणि त्याने त्यांना बोलावले.
मत्तय 4 वाचा
ऐका मत्तय 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 4:18-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ