मत्तय 28:2-7
मत्तय 28:2-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यावेळी पाहा, तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला. त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते. पहारा करणारे शिपाई खूप घाबरले, ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यांसारखे झाले. देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, कारण मी जाणतो की, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात. पण तो इथे नाही कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पाहा. आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, तो मरणातून उठला आहे आणि बघा, तो तुमच्यापुढे गालील प्रांतात जात आहे आणि तुम्ही त्यास तेथे पाहाल. पाहा, मी तुम्हास सांगितले आहे.”
मत्तय 28:2-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेवढ्यात एकाएकी तीव्र भूकंप झाला, कारण स्वर्गातून प्रभूचा एक दूत खाली आला, कबरेजवळ जाऊन त्याने कबरेवरील धोंड बाजूला लोटली आणि तो तिच्यावर बसला. त्याचे मुख विजेसारखे तेजस्वी आणि त्याचे वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती. पहारेकर्यांनी त्याला पाहिले व ते भयभीत झाले, थरथर कापले आणि मृतवत झाले. देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, क्रूसावर खिळलेल्या येशूंना तुम्ही शोधीत आहात, हे मला माहीत आहे. ते येथे नाहीत; त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उठले आहेत. या आणि ज्या ठिकाणी त्यांना ठेवले होते ती जागा पाहा. आता लवकर जा आणि त्यांच्या शिष्यांना सांगा: ‘येशू मेलेल्यामधून पुन्हा उठले आहेत आणि ते तुमच्यापुढे गालीलात जात आहेत. ते तिथे तुम्हाला भेटतील.’ जसे मी तुम्हाला सांगितले.”
मत्तय 28:2-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा पाहा, मोठा भूमिकंप झाला; कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला, त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तिच्यावर तो बसला. त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, “तुम्ही भिऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्ही करत आहात, हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही; कारण त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या, प्रभू निजला होता ते हे स्थळ पाहा. आणि लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा की, तो मेलेल्यांतून उठला आहे; पाहा, तो तुमच्याआधी गालीलात जात आहे, तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल; पाहा, मी तुम्हांला हे सांगितले आहे.”
मत्तय 28:2-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्या समयी पाहा, भयंकर भूकंप झाला. प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला. त्याने येऊन शिळा एकीकडे लोटली आणि तो तिच्यावर बसला. त्याचे रूप आकाशातील विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. परंतु देवदूताने त्या स्त्रियांना म्हटले, “भिऊ नका. तुम्ही क्रुसावर खिळलेल्या येशूचा शोध करीत आहात, हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही, त्याने सांगितल्याप्रमाणे तो उठला आहे. या. त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा. तर मग लवकर जाऊन त्याच्या शिष्यांना सांगा, “तो मेलेल्यांतून उठला आहे, पाहा, तो तुमच्या आधी आता गालीलमध्ये जात आहे. तेथे तो तुमच्या दृष्टीस पडेल!’ पाहा, मी तुम्हांला सांगितले आहे.”