YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 28:2-7

मत्तय 28:2-7 MRCV

तेवढ्यात एकाएकी तीव्र भूकंप झाला, कारण स्वर्गातून प्रभूचा एक दूत खाली आला, कबरेजवळ जाऊन त्याने कबरेवरील धोंड बाजूला लोटली आणि तो तिच्यावर बसला. त्याचे मुख विजेसारखे तेजस्वी आणि त्याचे वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती. पहारेकर्‍यांनी त्याला पाहिले व ते भयभीत झाले, थरथर कापले आणि मृतवत झाले. देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, क्रूसावर खिळलेल्या येशूंना तुम्ही शोधीत आहात, हे मला माहीत आहे. ते येथे नाहीत; त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उठले आहेत. या आणि ज्या ठिकाणी त्यांना ठेवले होते ती जागा पाहा. आता लवकर जा आणि त्यांच्या शिष्यांना सांगा: ‘येशू मेलेल्यामधून पुन्हा उठले आहेत आणि ते तुमच्यापुढे गालीलात जात आहेत. ते तिथे तुम्हाला भेटतील.’ जसे मी तुम्हाला सांगितले.”