YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 20:20-34

मत्तय 20:20-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, “तुला काय पाहिजे?” ती त्याला म्हणाली, “तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा.” येशू म्हणाला, “तुम्ही काय मागता हे तुम्हांला समजत नाही; जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हांला पिता येईल काय? [आणि जो बाप्तिस्मा मला घ्यायचा आहे तो घेववेल काय?]” ते त्याला म्हणाले, “आम्हांला शक्य आहे.” त्याने त्यांना म्हटले, “माझा प्याला तुम्ही प्याल खरा, [व जो बाप्तिस्मा मला घ्यायचा आहे तो घ्याल,] पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे.” ही गोष्ट ऐकून दहा शिष्यांना त्या दोघा भावांचा राग आला. पण येशूने त्यांना बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. तसे तुमच्यामध्ये नसावे; तर जो कोणी तुमच्यामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” मग ते यरीहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून चालला. तेव्हा पाहा, वाटेवर बसलेले दोन आंधळे येशू जवळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, “हे प्रभो, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा.” त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यांना धमकावले; तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, “प्रभो, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा.” येशूने उभे राहून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करू? तुमची काय इच्छा आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, आमचे डोळे उघडावे.” तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला; तेव्हा त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्यामागून चालले.

सामायिक करा
मत्तय 20 वाचा

मत्तय 20:20-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्यानंतर जब्दीच्या मुलांची आई, आपल्या मुलांसह त्याच्याकडे आली. ती त्याच्या पाया पडली आणि तिने त्यास एक विनंती केली. त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, “माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.” तो तिला म्हणाला, “तू काय मागत आहेस ते तुला समजत नाही! जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हास पिता येईल काय?” ते म्हणाले, होय, “पिता येईल!” येशू त्याना म्हणाला, “तुम्ही खरोखर माझ्या प्याल्यातून प्याल खरे, पण माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याचा मान कोणाला देणे हे ठरविणारा मी नाही, तर माझ्या पित्याने तो मान कोणाला द्यायचा हे ठरवले आहे.” जेव्हा इतर दहा शिष्यांनी हे ऐकले तेव्हा ते त्या दोघां भावांवर नाराज झाला. मग येशूने त्यांना बोलावून म्हटले, “परराष्ट्रीय लोकांच्या राजांना लोकांवर आपली सत्ता आहे हे दाखवणे आवडले आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना आपले अधिकार वाटेल तसे वापरणे आवडते. पण तुमचे वागणे तसे नसावे. जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. आणि ज्याला पहिला व्हावयाचे आहे त्याने दास झाले पाहिजे. म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.” ते यरीहो शहर सोडत असताना, मोठा लोकसमुदाय त्याच्यामागे आला. रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभू येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.” जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया करा.” मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, “प्रभूजी, आम्हास दिसावे अशी आमची इच्छा आहे.” येशूला त्यांच्यांबद्दल कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले आणि ते त्याच्यामागे गेले.

सामायिक करा
मत्तय 20 वाचा

मत्तय 20:20-34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मग जब्दीच्या पुत्रांची आई तिच्या मुलांना घेऊन येशूंकडे आली. तिने त्यांच्यासमोर गुडघे टेकले आणि त्यांच्याजवळ एक कृपादान मागितले. येशूंनी तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, “तुमच्या राज्यामध्ये माझा या दोन पुत्रातील एकाला आपल्या उजवीकडे व दुसर्‍याला डावीकडे बसू द्यावे.” यावर येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे, तो तुम्ही पिऊ शकाल काय?” त्यांनी उत्तर दिले, “आम्ही तो पिऊ शकू!” “त्या प्याल्यातून तुम्ही प्याल यात शंका नाही,” येशूंनी त्यांना म्हटले, “परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणी बसावे, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. या जागा माझ्या पित्याने ज्यांच्यासाठी तयार केल्या आहेत, त्यांनाच मिळतील.” हे बाकीच्या दहा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांना त्या दोन्ही भावांचा खूप राग आला. हे पाहून येशूंनी त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “गैरयहूदी लोकांचे शासक त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांचे उच्चाधिकारी त्यांच्यावर अधिकार गाजविणारे हे तुम्हाला माहीत आहे. पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने तुमचा गुलाम व्हावे. मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.” येशू व त्यांचे शिष्य हे यरीहो शहर सोडून जात असताना, त्यांच्यामागे खूप मोठी गर्दी चालली होती. दोन आंधळी माणसे रस्त्याच्या कडेला बसली होती. येशू आपल्या बाजूने येत आहेत, हे त्यांनी ऐकले, तेव्हा ते मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दावीदाचे पुत्र! आम्हावर दया करा!” गर्दीतील लोकांनी त्यांना धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, तर ते अधिक मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “अहो प्रभू, दावीदाचे, पुत्र, आम्हावर दया करा!” येशू थांबले आणि त्यांनी आंधळ्यांना बोलाविले व ते म्हणाले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” “प्रभूजी,” त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला आमची दृष्टी यावी.” येशूंना त्यांचा कळवळा आला; त्यांनी त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला; ताबडतोब त्यांना दिसू लागले आणि ते त्यांच्यामागे चालू लागले.

सामायिक करा
मत्तय 20 वाचा

मत्तय 20:20-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागितले. त्याने तिला म्हटले, “तुला काय पाहिजे?” ती त्याला म्हणाली, “तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा.” येशू म्हणाला, “तुम्ही काय मागता हे तुम्हांला समजत नाही; जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हांला पिता येईल काय? [आणि जो बाप्तिस्मा मला घ्यायचा आहे तो घेववेल काय?]” ते त्याला म्हणाले, “आम्हांला शक्य आहे.” त्याने त्यांना म्हटले, “माझा प्याला तुम्ही प्याल खरा, [व जो बाप्तिस्मा मला घ्यायचा आहे तो घ्याल,] पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे.” ही गोष्ट ऐकून दहा शिष्यांना त्या दोघा भावांचा राग आला. पण येशूने त्यांना बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. तसे तुमच्यामध्ये नसावे; तर जो कोणी तुमच्यामध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल, आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.” मग ते यरीहोहून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून चालला. तेव्हा पाहा, वाटेवर बसलेले दोन आंधळे येशू जवळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, “हे प्रभो, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा.” त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यांना धमकावले; तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, “प्रभो, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा.” येशूने उभे राहून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करू? तुमची काय इच्छा आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, आमचे डोळे उघडावे.” तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला; तेव्हा त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्यामागून चालले.

सामायिक करा
मत्तय 20 वाचा

मत्तय 20:20-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्या वेळी जब्दीची पत्नी तिच्या मुलांसह येशूकडे येऊन त्याला नमन करून त्याच्याकडून काही मागू लागली. त्याने तिला म्हटले, “तुला काय पाहिजे?” ती त्याला म्हणाली, तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे स्थान मिळेल, असे जाहीर करा.” येशू म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात, हे तुम्हांला समजत नाही. जो प्याला मला प्राशन केला पाहिजे, तो तुम्ही पिऊ शकाल का? जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे, तो तुम्ही घेऊ शकाल का?” ते त्याला म्हणाले, “आम्ही तसे करू शकू.” त्याने त्यांना म्हटले, “माझा प्याला तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घ्याल, हे खरे, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. तर त्या जागा ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने सिद्ध केल्या आहेत, त्यांना मिळतील.” हे ऐकून इतर दहा शिष्य त्या दोघा भावांवर संतापले. परंतु येशूने त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत, ते लोकांवर सत्ता चालवतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार गाजवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. पण तुमचे तसे नसावे. जो तुमच्यामध्ये थोर होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक व्हावे आणि जो कोणी तुमच्यामध्ये पहिला होऊ पाहतो, त्याने तुमचा दास व्हावे. जसे मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नव्हे, तर सेवा करायला व पुष्कळांसाठी आपला प्राण खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे.” येशू आणि त्याचे शिष्य यरीहो सोडून जात असताना मोठा लोकसमुदाय त्याच्यामागून जाऊ लागला. तेव्हा येशू जवळून जात आहे, हे ऐकून रस्त्याच्या कडेला बसलेले दोन आंधळे ओरडून म्हणाले, “प्रभो, दावीदपुत्रा, आमच्यावर दया करा.” त्यांनी गप्प राहावे म्हणून लोकांनी त्यांना धमकावले, परंतु ते अधिकच ओरडून म्हणाले, “प्रभो, दावीदपुत्रा, आमच्यावर दया करा.” येशूने थांबून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करावे, अशी तुमची इच्छा आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभो, आम्हांला दृष्टी प्राप्त व्हावी.” येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्यांना तत्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागे गेले.

सामायिक करा
मत्तय 20 वाचा