मत्तय 12:46-50
मत्तय 12:46-50 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते. तेव्हा कोणीतरी त्यास म्हणाले, “तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत.” त्याच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले, “कोण माझी आई? कोण माझा भाऊ?” मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ हे आहेत. कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई.”
मत्तय 12:46-50 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू समूहाशी बोलत असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. कोणी त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर उभे आहेत व आपल्याशी बोलू इच्छित आहेत.” त्यांनी त्याला उत्तर दिले, “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?” मग आपल्या शिष्यांकडे बोट दाखवीत ते म्हणाले, “हे माझी आई आणि माझे भाऊ आहेत. ते पुढे म्हणाले, जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि माझी आई आहे.”
मत्तय 12:46-50 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग तो लोकसमुदायांबरोबर बोलत असता पाहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. तेव्हा कोणीएकाने त्याला सांगितले, “पाहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत.” तेव्हा त्याने सांगणार्याला उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?” आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ! कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई.”
मत्तय 12:46-50 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू लोकसमुदायाबरोबर बोलत असता त्याची आई व त्याचे भाऊ त्याला भेटायला बाहेर उभे राहिलेले होते. [तेव्हा कोणा एकाने त्याला सांगितले, “पाहा, आपली आई व आपले भाऊ आपल्याला भेटायला बाहेर उभे राहिलेले आहेत.”] परंतु त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?” आणि त्याच्या शिष्यांकडे हात करत तो म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ! जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो माझा भाऊ, ती माझी बहीण व माझी आई.”