मत्तय 11:7-14
मत्तय 11:7-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग ते जात असता येशू योहानाविषयी लोकांशी बोलू लागला, तुम्ही वैराण प्रदेशात काय पाहायला गेला होता? वाऱ्याने हलविलेला बोरू काय? तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे घातलेल्या मनुष्यास पाहायला गेला होता काय? तलम वस्त्रे घालणारे राजाच्या घरात असतात. तर मग तुम्ही बाहेर कशाला गेला होतात? संदेष्ट्याला पाहायला काय? होय. मी तुम्हास सांगतो आणि संदेष्ट्यांपेक्षाही अधिक मोठा असा त्याला. त्याच्याविषयी असे लिहिण्यात आले आहे की, पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील. मी तुम्हास खरे सांगतो की, स्त्रीयांपासून जन्मलेल्यांमध्ये बाप्तिस्मा करणारा योहान याच्यापेक्षा मोठा असा कोणी झाला नाही, तरीही स्वर्गाच्या राज्यात जो अगदी लहान आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. बाप्तिस्मा करणारा योहान याच्या दिवसापासून आतापर्यंत लोक स्वर्गाच्या राज्यावर जोराने हल्ला करीत आहे आणि हल्ला करणारे ते हिरावून घेतात. कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र यांनी भविष्य सांगितले. आणि जर तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असाल तर येणारा एलीया तो हाच आहे.
मत्तय 11:7-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योहानाचे शिष्य निघून गेल्यावर येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्याच्या झोताने हलणार्या लव्हाळ्याला काय? जर नाही, तर मग काय पाहावयाला तुम्ही गेला होता? किमती पोशाख घातलेला एखादा पुरुष काय? नाही, भारी पोशाख घालणारे राजाच्या राजवाडयातच आहेत. तर मग तुम्ही काय पाहावयास गेला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हाला सांगतो, संदेष्ट्यापेक्षाही अधिक.” हा तोच आहे ज्याच्याविषयी हे लिहिले आहे: “ ‘मी आपला संदेशवाहक तुझ्यापुढे पाठवीन आणि तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करील.’ मी तुम्हाला निश्चित सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्या व्यक्तिंमध्ये योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जो कनिष्ठ आहे, तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. योहानाच्या काळापासून आतापर्यंत स्वर्गाचे राज्य मोठ्या शक्तीने पसरत आहे. आणि आवेशी लोक याचे अधिकार प्राप्त करीत आहेत. कारण सर्व संदेष्ट्यांनी आणि नियमशास्त्रांनी योहानापर्यंत भविष्यकथन केलेले आहे. आणि ते मान्य करण्याची तुमची तयारी असेल तर ऐका: येणारा एलीया तो हाच आहे.
मत्तय 11:7-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते जात असता येशू लोकसमुदायांबरोबर योहानाविषयी बोलू लागला : “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वार्याने हलवलेला बोरू काय? तर मग काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे धारण केलेल्या माणसाला काय? पाहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात. तर मग का गेला होता? संदेष्ट्याला पाहायला काय? मी तुम्हांला सांगतो, हो; संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला. ‘पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यासमोर पाठवतो, तो तुझ्यापुढे’ तुझा ‘मार्ग सिद्ध करील,’ असे ज्याच्याविषयी लिहिले आहे तो हाच आहे. मी तुम्हांला खचीत सांगतो की, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही; तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्या दिवसांपासून तो आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत. कारण योहानापर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्यांनी संदेश दिले; आणि हे पत्करण्याची तुमची इच्छा असेल तर जो एलीया येणार तो हाच आहे.
मत्तय 11:7-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
योहानचे शिष्य परत गेल्यावर येशू लोकसमुदायाबरोबर योहानविषयी बोलू लागला, “तुम्ही काय पाहायला रानात गेला होता? वाऱ्याने हालविलेला बोरू काय? काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे परिधान केलेल्या माणसाला काय? पाहा, तलम वस्त्रे वापरणारे राजवाड्यात असतात. तर मग का गेला होता? संदेष्ट्याला पाहायला काय? होय, खरेच संदेष्ट्याला. परंतु तुम्ही संदेष्ट्याहूनही जो श्रेष्ठ त्याला पाहिले. ‘पाहा, मी माझ्या निरोप्याला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील’, असे ज्याच्याविषयी लिहिले आहे, तो हाच आहे. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा देणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी झाला नाही. मात्र स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहूनही श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा देणारा योहान ह्याच्या दिवसांपासून आतापर्यंत स्वर्गाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावत आहेत. योहान येईपर्यंत सर्व संदेष्टे व नियमशास्त्र ह्यांनी हा संदेश दिला आणि त्यांचा संदेश स्वीकारण्याची तुमची इच्छा असेल, तर जो एलिया येणार, तो हाच आहे.