मत्तय 11:26-30
मत्तय 11:26-30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
होय पित्या, तू हे केलेस, कारण खरोखर तुला हेच योग्य वाटले होते. माझ्या पित्याने मला सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही आणि पुत्रावाचून ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही. अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन. मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.”
मत्तय 11:26-30 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण हे पित्या, असे करणेच तुम्हाला उचित वाटले. “माझ्या पित्याने माझ्याकडे सर्वकाही सोपविले आहे. पुत्राला पित्याशिवाय कोणी ओळखत नाही आणि पिता कोण आहे, हे पुत्रावाचून व पुत्राने ज्या कोणाला त्यांची ओळख करून देण्यासाठी निवडले असेल, त्या वाचून कोणीही पित्याला ओळखत नाही. “जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल. कारण माझे जू हलके व माझे ओझे सहज पेलवणारे आहे.”
मत्तय 11:26-30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्वकाही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही. अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे ‘तुमच्या जिवांना विसावा मिळेल.’ कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे.”
मत्तय 11:26-30 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
होय, पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही. पुत्रावाचून व ज्या कोणास त्याला प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही. अहो कष्ट करणाऱ्यांनो व ओझ्याखाली दबलेल्यांनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. मी मनाचा सौम्य व लीन आहे. माझे जू आपल्यावर घ्या व माझ्याकडून शिका म्हणजे तुमच्या जिवाला विसावा मिळेल; कारण माझे जू सोपे व माझे ओझे हलके आहे.”