मत्तय 11:18-19
मत्तय 11:18-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण योहान खातपीत आला नाही, तर त्याला भूत लागले असे म्हणतात. मनुष्याचा पुत्र खातपीत आला; तर त्याच्याविषयी म्हणतात, ‘पाहा, खादाड व दारूबाज मनुष्य, जकातदारांचा व पापी जनांचा मित्र!’ परंतु ज्ञान आपल्या कृत्यांच्या योगे न्यायी ठरते.”
मत्तय 11:18-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
योहान काही न खाता व पिता आला, पण ते म्हणतात त्यास भूत लागले आहे. मनुष्याचा पुत्र खातपीत आला. ते म्हणतात, पाहा, हा खादाडा व दारूबाज, जकातदार व पापी लोकांचा मित्र, परंतु ज्ञानाची योग्यता त्याच्याद्वारे घडणाऱ्या योग्य गोष्टीमुळे ठरते.
मत्तय 11:18-19 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण योहान काहीही न खाता किंवा पिता आला होता आणि ते म्हणतात, ‘तो दुरात्म्याने ग्रस्त आहे.’ मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि ते म्हणतात, ‘पाहा, हा खादाड आणि मद्यपी मनुष्य! जकातदार आणि पापी लोक यांचा मित्र!’ परंतु ज्ञान आपल्या कृत्याने खरे असे सिद्ध झाले आहे.”
मत्तय 11:18-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण योहान उपवास करत असे व मद्य पीत नसे, तेव्हा ‘त्याला भूत लागले आहे’, असे लोक म्हणत असत. मनुष्याचा पुत्र खातपीत आला तर त्याच्याविषयी लोक म्हणतात, ‘पाहा, खादाड व दारूबाज मनुष्य. जकातदारांचा व पापी लोकांचा मित्र!’ परंतु परमेश्वराची सुज्ञता त्याच्या कृत्यांवरून सिद्ध होते.”