YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 10:34-42

मत्तय 10:34-42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे. मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे. सारांश, मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील. जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील. जी व्यक्ती तुम्हास स्वीकारते ती व्यक्ती मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते. जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्यास संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्यास नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. मी तुम्हास खरे सांगतो की, या लहानातील एकाला शिष्य म्हणून जो कोणी प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तोही आपल्या प्रतिफळाला मुळीच मुकणार नाही.

सामायिक करा
मत्तय 10 वाचा

मत्तय 10:34-42 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे अशी कल्पना करू नका. शांती देण्यासाठी नाही, तर तलवार चालवण्यास आलो आहे. “ ‘पुत्राला आपल्या पित्याविरुद्ध, मुलीला आपल्या आईविरुद्ध, आणि सूनेला तिच्या सासूविरुद्ध करण्यासाठी मी आलो आहे. एखाद्या मनुष्याच्या स्वतःच्या घरातीलच लोक त्याचे शत्रू होतील.’ “जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आईवडिलांवर अधिक प्रेम करीत असेल, तर तो मला पात्र नाही; जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या पुत्र व कन्यांवर अधिक प्रेम करीत असेल तर ते मला पात्र नाही. जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला पात्र नाही. जो आपल्या जीवाला जपतो, तो आपला जीव गमावील आणि जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो, तो आपला जीव सुरक्षित राखील. “जे तुमचे स्वागत करतात, ते माझे स्वागत करतात आणि जे माझे स्वागत करतात, ते ज्यांनी मला पाठविले त्यांचे स्वागत करतात. जो संदेष्ट्यांचा संदेष्टा म्हणून स्वीकार करतो, त्याला संदेष्ट्यांचे प्रतिफळ मिळेल; जो कोणी नीतिमान मनुष्याचा स्वीकार नीतिमान आहे म्हणून करतो, त्याला नीतिमान मनुष्याचे प्रतिफळ मिळेल. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जर कोणी या लहानातील एकाला जो माझा शिष्य आहे त्याला पेलाभर थंड पाणी प्यावयास दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही.”

सामायिक करा
मत्तय 10 वाचा

मत्तय 10:34-42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलो असे समजू नका. मी शांतता आणण्यास नव्हे तर तलवार चालवण्यास आलो आहे. कारण ‘मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यात फूट’ पाडण्यास मी आलो आहे; आणि ‘मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.’ जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावला तो त्याला राखील. जो तुम्हांला स्वीकारतो, तो मला स्वीकारतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. आणि ह्या लहानांतील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचीत सांगतो.”

सामायिक करा
मत्तय 10 वाचा

मत्तय 10:34-42 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

मी पृथ्वीवर शांती आणायला आलो आहे, असे समजू नका. शांती नव्हे तर तलवार घेऊन मी आलो आहे. मुलगा व वडील, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यांत फूट पाडायला मी आलो आहे. मनुष्याचे कुटुंबीयच त्याचे वैरी होतील. जो माझ्यापेक्षा वडिलांवर किंवा आईवर अधिक प्रेम करतो, तो माझ्यासाठी योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो, तोही माझ्यासाठी योग्य नाही. जो आपला क्रुस उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, तो माझ्यासाठी योग्य नाही. जो आपले जीवन वाचवतो, तो ते गमावेल आणि जो माझ्याकरता आपले जीवन गमावतो, तो ते वाचवेल. जो तुमचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो माझा स्वीकार करतो, तो ज्याने मला पाठवले, त्याचा स्वीकार करतो. जो कोणी संदेष्ट्याचा संदेष्टा म्हणून स्वीकार करतो, त्याला संदेष्ट्याचे पारितोषिक मिळेल. जो कोणी नीतिमान माणसाचा नीतिमान माणूस म्हणून स्वीकार करतो, त्याला नीतिमान माणसाचे पारितोषिक मिळेल. ह्या लहानांतल्या एकाला तो माझा शिष्य आहे म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो त्याला त्याचे पारितोषिक मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हांला निक्षून सांगतो.”

सामायिक करा
मत्तय 10 वाचा