YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 10:34-38

मत्तय 10:34-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे. मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे. सारांश, मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील. जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही.

सामायिक करा
मत्तय 10 वाचा

मत्तय 10:34-38 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“मी पृथ्वीवर शांती देण्यासाठी आलो आहे अशी कल्पना करू नका. शांती देण्यासाठी नाही, तर तलवार चालवण्यास आलो आहे. “ ‘पुत्राला आपल्या पित्याविरुद्ध, मुलीला आपल्या आईविरुद्ध, आणि सूनेला तिच्या सासूविरुद्ध करण्यासाठी मी आलो आहे. एखाद्या मनुष्याच्या स्वतःच्या घरातीलच लोक त्याचे शत्रू होतील.’ “जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आईवडिलांवर अधिक प्रेम करीत असेल, तर तो मला पात्र नाही; जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या पुत्र व कन्यांवर अधिक प्रेम करीत असेल तर ते मला पात्र नाही. जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला पात्र नाही.

सामायिक करा
मत्तय 10 वाचा