लूक 8:52-55
लूक 8:52-55 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मरण पावली नाही, तर झोपेत आहे.” तरी ती मरण पावली आहे हे जाणून ते त्यास हसू लागले. पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, “मुली, ऊठ.” तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली; मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली.
लूक 8:52-55 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते घर शोक करणार्या लोकांनी भरून गेले होते. पण येशू त्यांना म्हणाले, “रडणे थांबवा. ही मुलगी मरण पावलेली नाही, झोपलेली आहे.” तेव्हा ते त्यांना हसले, कारण ती मेली होती, हे त्या सर्वांना माहीत होते. मग येशूंनी तिचा हात धरून तिला म्हटले, “माझ्या मुली ऊठ!” त्यावेळी तिचा प्राण परत आला आणि ती तत्काळ उठून उभी राहिली. तेव्हा येशू म्हणाले, “तिला काहीतरी खावयास द्या.”
लूक 8:52-55 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तिच्यासाठी सर्व जण रडत व शोक करत होते; पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे.” तरी ती मेली हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. मग सर्वांना बाहेर घालवून त्याने तिच्या हाताला धरून, “मुली, ऊठ,” असे मोठ्याने म्हटले. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तत्काळ उठली; मग तिला खायला द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली.
लूक 8:52-55 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तिच्यासाठी सर्व जण रडत व शोक करत होते. पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती निधन पावली नाही, झोपेत आहे.” तरीही ती मरण पावली आहे, हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. त्याने तिच्या हाताला धरून मोठ्याने म्हटले, “मुली, ऊठ!” तेव्हा ती जिवंत झाली व तत्काळ उठली. त्यानंतर तिला खायला द्यावे असे त्याने सांगितले.