लूक 8:5-7
लूक 8:5-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“पेरणारा आपले बी पेरायला निघाला; आणि तो पेरीत असता काही बी पाय वाटेवर पडले आणि ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी ते खाऊन टाकले. आणि काही खडकाळीवर पडले आणि ते उगवल्यावर वाळून गेले, कारण त्यास ओलावा नव्हता. आणि काही काटेरी झाडाझुडपांमध्ये पडले आणि झाडाझुडपांबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली.
लूक 8:5-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. तो बी पेरीत असताना, काही वाटेवर पडले; व तुडविले गेले व आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले, ते वर आले, परंतु ओलाव्याच्या अभावी ती रोपे करपून गेली. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, ते उगवले आणि त्याबरोबर वाढले, पण झुडपांनी त्याची वाढ खुंटविली.
लूक 8:5-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“पेरणारा आपले बी पेरायला निघाला; आणि तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले; ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले. काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले; काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली.
लूक 8:5-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
“पेरणारा बी पेरायला निघाला. तो पेरीत असताना काही बी वाटेवर पडले. ते तुडवले गेले व आकाशातील पक्ष्यांनी खाऊन टाकले. काही खडकाळ जमिनीवर पडले. ओलावा नसल्यामुळे ते उगवताच वाळून गेले. काही काटेरी झुडुपांमध्ये पडले. काटेरी झुडुपांच्या वाढीमुळे त्यांची वाढ खुंटली.