लूक 8:12-14
लूक 8:12-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरून तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. आणि जे खडकाळीवरचे हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात. आणि काटेरी झाडांमध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत, पण पुढे जाता जाता चिंता व धन व या जीवनातली सुखे यांनी गुदमरून जातात व भरदार फळ देत नाहीत.
लूक 8:12-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पायवाटेवर पडलेले ते, जे वचन ऐकतात, पण सैतान येतो आणि पेरलेले वचन हृदयातून हिरावून नेतो आणि त्यामुळे त्यांना विश्वास ठेवण्याची व तारणाची संधी मिळत नाही. खडकाळ जमिनीसारखे असलेले ते हे, जे वचन आनंदाने स्वीकारतात, पण त्यांना मूळ नसल्यामुळे ते किंचितकाळ विश्वास ठेवतात, परंतु परीक्षा आली म्हणजे ते पडतात. काटेरी झाडांमध्ये काही बी पडले, ते असे आहेत की जे ऐकतात, परंतु जीवन जगतांना, जीवनातील काळजी, पैसा, सुखविलास यामुळे त्यांची वाढ खुंटते व ते परिपक्व होत नाहीत
लूक 8:12-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
वाटेवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात; नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांना तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणांतून वचन काढून घेतो. खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात; पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात. काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की, ते ऐकतात, आणि संसाराच्या चिंता, धन व विषयसुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्वफळ देत नाहीत.
लूक 8:12-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
वाटेवर पडलेले बी म्हणजे जे ऐकतात परंतु सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणांतून वचन काढून घेतो आणि त्यांना विश्वास ठेवण्यापासून व तारणप्राप्ती करून घेण्यापासून वंचित करतो. खडकाळ जमिनीवर पडलेले बी म्हणजे जे ऐकतात व आनंदाने वचन ग्रहण करतात, पण त्यांना मूळ नसते. ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात पण कसोटीच्या वेळी बहकून जातात. काटेरी झुडुपांमध्ये पडलेले बी म्हणजे जे ऐकतात पण संसाराच्या चिंता, धनदौलत व ऐहिक सुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व त्यांच्या जीवनात परिपक्व फळ दिसत नाही.