लूक 19:7-9
लूक 19:7-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.” तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे धन गरिबांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असले तर ते चौपट परत करतो.” येशू त्यास म्हणाला, “आज या घराचे तारण झाले आहे कारण हा मनुष्यसुद्धा अब्राहामाचा मुलगा आहे.
लूक 19:7-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सर्व लोकांनी हे पाहिले आणि ते कुरकुर करू लागले, “तो एका पापी माणसाच्या घरी पाहुणा म्हणून गेला आहे.” पण जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, आताच मी माझी अर्धी धनसंपत्ती गरिबांना देऊन टाकतो आणि मी फसवणूक करून कोणाचे काही घेतले असेल, तर चौपट रक्कम परत करतो.” येशू त्याला म्हणाले, “आज या घरात तारणाने प्रवेश केला आहे, हा मनुष्य अब्राहामाचा पुत्र आहे.
लूक 19:7-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.” तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.” येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे.
लूक 19:7-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभो, पाहा, माझ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा मी गोरगरिबांना देईन व अन्यायाने मी कोणाचे काही घेतले असेल, तर ते चौपट परत करीन.” येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे.