लूक 12:1-12
लूक 12:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले; तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “तुम्ही आपणांस परूश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोललात ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या कोठड्यांत कानात सांगितले ते धाब्यांवर गाजवले जाईल. माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात, पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा; हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात. मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील; परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल; परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हांला सभा, सरकार व अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्यांविषयी काळजी करू नका; कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.”
लूक 12:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्यादरम्यान हजारो लोकांचा समुदाय जमला होता आणि एवढा की ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोललाः “परूश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी जपा. उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुप्त नाही. म्हणून तुम्ही जे काही अंधारात बोलाल ते उजेडात ऐकले जाईल आणि तुम्ही कोणाच्या कानात जे काही एकांतात सांगाल ते घराच्या छतावरुन घोषित केले जाईल.” “परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हास सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नका, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सांगतो. तुम्हास ठार मारल्या यानंतर तुम्हास नरकात टाकून देण्यास ज्याला अधिकार आहे, त्याची भीती धरा. होय, मी तुम्हास सांगतो, त्याचेच भय धरा. पाच चिमण्या दोन नाण्यांना विकतात की नाही? तरी त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही. पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मूल्य जास्त आहे. जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या प्रत्येक मनुष्यास देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील. परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल. प्रत्येक मनुष्य जो मनुष्याच्या पुत्राविरुद्ध बोलतो, त्यास क्षमा केली जाईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्यास क्षमा केली जाणार नाही. जेव्हा ते तुम्हास सभास्थाने, राज्यकर्ते व अधिकारी यांच्यासमोर धरुन आणतील तेव्हा तुम्ही काय बोलावे किंवा स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी आधीच चिंता करीत बसू नका. कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्याचवेळी तुम्हास शिकवील.”
लूक 12:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या दरम्यान हजारोंच्या संख्येने लोक एकत्र झाले त्यामुळे ते एकमेकास चेंगरू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना म्हणाले, “या परूशी लोकांच्या खमिरापासून म्हणजे ढोंगीपणापासून सांभाळा. जे प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा जे गुप्त आहे ते उघडकीस येणार नाही. जे तुम्ही अंधारात सांगितले आहे, ते दिवसाच्या प्रकाशात ऐकले जाईल; जे तुम्ही आतील खोलीत कानात सांगितले, ते घराच्या धाब्यावरून जाहीर केले जाईल. “माझ्या मित्रांनो, जे शरीराचा नाश करतात व त्यानंतर काही करण्यास समर्थ नाहीत अशांना भिऊ नका. कोणाचे भय बाळगावे, हे मी तुम्हाला सांगतो: शरीराचा वध केल्यानंतर, नरकात टाकण्याचा ज्याला अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. होय, मी सांगतो त्याचीच भीती बाळगा. पाच चिमण्या दोन पैशात विकत नाहीत काय? तरी त्यापैकी एकही चिमणीचा परमेश्वराला विसर पडत नाही. खरोखर, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. म्हणून भीती बाळगू नका; कारण तुम्ही पुष्कळ चिमण्यांपेक्षा अधिक मोलवान आहात. “मी तुम्हाला सांगतो, की जर कोणी मला इतरांपुढे जाहीरपणे स्वीकारेल, तर मानवपुत्र सुद्धा देवदूतांसमक्ष जाहीरपणे तुमचा स्वीकार करेन. तरी जे मला लोकांसमोर नाकारतात, त्यांना मी परमेश्वराच्या दूतांसमक्ष नाकारीन. आणि प्रत्येकजण जो मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जे कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतात त्यांना कधीही क्षमा केली जाणार नाही. “ज्यावेळी तुम्हाला सभागृह, पुढारी, राज्यकर्ते यांच्यापुढे आणण्यात येईल, तेव्हा तुम्ही स्वतःचा बचाव कसा करावा व काय बोलावे याविषयी चिंता करू नका. कारण तुम्ही तिथे उभे असताना, काय बोलावे हे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेल.”
लूक 12:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले; तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “तुम्ही आपणांस परूश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोललात ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या कोठड्यांत कानात सांगितले ते धाब्यांवर गाजवले जाईल. माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात, पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा; हो, मी तुम्हांला सांगतो, त्याचीच भीती बाळगा. पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात. मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील; परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल; परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हांला सभा, सरकार व अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे ह्यांविषयी काळजी करू नका; कारण तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.”
लूक 12:1-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्या वेळी येशूभोवती हजारो लोकांची इतकी गर्दी जमली होती की, तेथे चेंगराचेंगरी होऊ लागली. येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “परुश्यांचे खमीर म्हणजेच त्यांचा दांभिकपणा ह्याविषयी तुम्ही स्वतःला सांभाळा. जे उघड होणार नाही, असे काही झाकलेले नाही व जे कळणार नाही, असे काही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोललात ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आतल्या बंद खोलीत कुजबुज करून सांगितले, ते छपरावरून घोषित केले जाईल. माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही, त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी, हे मी तुम्हांला सुचवून ठेवतो:वध केल्यावर नरकात टाकायचा ज्याला अधिकार आहे, त्याची भीती बाळगा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याची भीती बाळगा. पाच चिमण्या दोन दमड्यांना विकतात की नाही? तरी त्यांच्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिऊ नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहात! मी तुम्हांला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो, त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील. परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो, तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल, त्याला क्षमा मिळेल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो, त्याला क्षमा मिळणार नाही. जेव्हा तुम्हांला सभास्थाने, सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्यासमोर नेतील, तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे, ह्याविषयी काळजी करू नका. तुम्ही काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हांला शिकवील.”