YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 4:32-35

लेवीय 4:32-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरु आणले तर ती दोष नसलेली मादी असावी. त्याने त्या कोकराच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरिता त्यास वधावे. याजकाने त्या पापार्पणातील काही रक्त घेऊन ते आपल्या बोटाने होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे वेदीच्या पायथ्याशी ओतावे. त्याने शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि होमवेदीवर तिचा परमेश्वरासाठी होम करावा. ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापांबद्दल याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.

सामायिक करा
लेवीय 4 वाचा

लेवीय 4:32-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जर कोणी पापार्पणासाठी अर्पण म्हणून एखादे कोकरू घेऊन येतो, तर ती एक निर्दोष मादी असावी. होमार्पणाच्या पशूंचा वध करतात तिथे तिला आणावे, तिच्या मस्तकावर हात ठेवावा आणि पापार्पण म्हणून तिचा वध करावा. “नंतर याजकाने पापार्पणाच्या रक्तातील काही रक्त बोटांनी घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावे, व राहिलेले सर्व रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतून द्यावे.” शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीचा उपयोग करतात, तसा या चरबीचा उपयोग करावा. याजकाने सर्व चरबी काढून तिचे वेदीवर याहवेहसमोर होम करावे. अशाप्रकारे याजक त्या व्यक्तींसाठी प्रायश्चित करेल, म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल.

सामायिक करा
लेवीय 4 वाचा

लेवीय 4:32-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोषहीन मादी असावी. त्याने पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणासाठी त्याचा वध करावा. याजकाने आपल्या बोटाने पापबलीचे थोडे रक्त घेऊन होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे. आणि शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि वेदीवर असलेल्या हव्यावर परमेश्वराप्रीत्यर्थ तिचा होम करावा; ह्या प्रकारे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने प्रायश्‍चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.

सामायिक करा
लेवीय 4 वाचा