YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 26:27-46

लेवीय 26:27-46 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

एवढे सर्व करूनही माझे तुम्ही ऐकले नाही व माझ्याविरुद्ध वागलात, तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन. आपल्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुमच्यावर येईल. तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी उद्ध्वस्त करीन, तुमच्या सूर्यमूर्ती1 फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तींच्या मढ्यांवर तुमची मढी फेकून देईन; माझ्या जिवाला तुमची किळस येईल. मी तुमची नगरे उजाड करीन, तुमची पवित्रस्थळे ओसाड करीन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा वास मी घेणार नाही. मी देशाची नासाडी करीन व हे पाहून देशात वसणारे तुमचे शत्रू चकित होतील. परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील. जितके दिवस देश ओस पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात राहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगत राहील; तेव्हा देशाला विसावा मिळून तो आपले शब्बाथ उपभोगत राहील. देश ओस असेपर्यंत त्याला विसावा मिळेल; म्हणजे तुम्ही त्यात राहत असता तुमच्या शब्बाथांनी मिळाला नाही इतका विसावा त्याला मिळेल. तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रूंच्या देशात असता मी अशी दहशत घालीन की, उडणार्‍या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील; तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीस लागले नसताही ते पळतील. कोणी पाठीस लागले नसताही ते तलवारच पाठीस लागल्यासारखे अडखळून एकमेकांवर पडतील; तुमच्या शत्रूंशी सामना करण्यासाठी तुमच्यात त्राण उरणार नाही. राष्ट्राराष्ट्रांत पांगून तुम्ही नाश पावाल; तुमच्या शत्रूंचा देश तुम्हांला ग्रासून टाकील. तुमच्यातील जे उरतील ते आपल्या शत्रूंच्या देशांत आपल्या दुष्टतेमुळे खंगत जातील आणि आपल्या वाडवडिलांच्या दुष्टतेमुळे त्यांच्याप्रमाणेच खंगतील. त्यांनी माझ्याविरुद्ध अपराध केला ह्यात त्यांची व त्यांच्या वाडवडिलांची दुष्टता होय असे ते कबूल करतील, तसेच ते माझ्याविरुद्ध चालले ह्या कारणामुळे मीही त्यांच्याविरुद्ध होऊन त्यांना शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील, आणि त्यांचे अशुद्ध2 ह्रदय लीन होऊन ते आपल्या दुष्टतेचा दंड मान्य करतील. तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी स्मरेन. त्याचप्रमाणे इसहाकाशी केलेला करार व अब्राहामाशी केलेला करार ह्यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन. त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि त्यांच्यावाचून ओस असेपर्यंत तो आपले शब्बाथ उपभोगत राहील; त्यांनी माझ्या निर्बंधांचा अव्हेर केला व माझे विधी तुच्छ मानले म्हणूनच त्यांच्या दुष्टतेबद्दल केलेली शिक्षा ते मान्य करतील. इतके झाले तरी ते आपल्या शत्रूंच्या देशात असताना त्यांचा समूळ नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नाकार करणार नाही अथवा त्यांना मी तुच्छ मानणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे; मी त्यांच्याकरता त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून मी सर्व राष्ट्रांदेखत त्यांना मिसर देशातून काढून बाहेर आणले; मी परमेश्वर आहे.” जे विधी, निर्बंध व नियम परमेश्वराने आपल्या व इस्राएल लोकांमध्ये सीनाय पर्वतावर मोशेच्या हस्ते ठरवले ते हेच होत.

सामायिक करा
लेवीय 26 वाचा

लेवीय 26:27-46 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरूद्ध वागला, तर मग संतापून मी तुमच्याविरुध्द चालेन आणि तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट शिक्षा करीन! तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची पाळी तुम्हावर येईल. तुमच्या पुजेची उच्चस्थाने मी नष्ट करीन; तुमच्या धूपवेद्या फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तीच्या मढ्यांवर तुमची मढी टाकीन; मला तुमचा वीट येईल. मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक द्रव्याचा वास मी घेणार नाही. मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील. परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील. जितके दिवस देश ओसाड पडून राहील आणि तुम्ही आपल्या शत्रूंच्या देशात रहाल तितके दिवस तुमचा देश आपले शब्बाथ उपभोगीत राहील. देश ओसाड असेपर्यंत तुम्ही राहत असताना तुमच्या शब्बाथांनी मिळाला नाही इतका विसावा त्यास मिळेल. तुमच्यातील जे उरतील त्यांच्या मनात ते शत्रुंच्या देशात असता मी अशी भिती घालीन की, उडणाऱ्या पाचोळ्याच्या आवाजाने ते पळून जातील, तलवार पाठीमागे लागल्यासारखे ते पळतील; कोणी पाठीमागे लागले नसतांनाही ते पडतील. कोणी पाठीस लागले नसतांनाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेंकावर पडतील. तुमच्या शत्रूविरूद्ध उभे राहण्याइतके बळ तुमच्यात नसणार. राष्ट्राराष्ट्रात पांगून तुमच्या शत्रूंच्या देशात तुम्ही नाहीसे व्हाल. तेव्हा उरलेले त्यांच्या शत्रूंच्या देशात आपल्या पापामुळे खंगत जातील आणि त्यांचे वाडवडील जसे त्यांच्या पापात खंगले त्याप्रमाणे ते आपल्या पापात खंगत जातील. परंतु कदाचित ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे व त्यांनी माझ्याविरूद्ध अपराध केला व माझ्या विरुध्द चालले हे कबूल करतील. या कारणामुळे, मीही त्यांच्याविरुद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध हृदय लीन होऊन ते आपल्या पापांबद्दलची शिक्षा मान्य करतील. तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी आठवेन तसेच इसहाकाशी केलेला करार व अब्राहाम ह्याच्याशी केलेला करार यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन. त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि ओस असेपर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; त्यांनी माझे विधी मानण्यास नकार दिला व माझे नियम तुच्छ लेखले म्हणूनच त्यांना त्यांच्या पापाचा दंड भरावा लागेल. इतके असताही ते त्यांच्या शत्रुंच्या देशात असताना, त्यांचा सपूंर्ण नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नकार करणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे. त्यांच्याकरिता मी त्यांच्या वाडवडिलांशी केलेल्या कराराची आठवण करीन, कारण मी त्यांचा देव व्हावे म्हणून त्यांच्या वाडवडिलांना मिसर देशातून बाहेर आणले आणि हे सर्व इतर राष्ट्रांनी पाहिले आहे. मी परमेश्वर आहे! हे विधी, नियम व निर्बंध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांस सांगितले.

सामायिक करा
लेवीय 26 वाचा

लेवीय 26:27-46 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“ ‘एवढे सर्व करूनही तुम्ही माझे ऐकणार नाही आणि माझ्याविरुद्ध वागाल, तर मी क्रोधायमान होऊन तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पातकांबद्दल तुम्हाला सातपट शिक्षा करेन. तुम्ही तुमच्या पुत्रांचे व तुमच्या कन्यांचे मांस खाल. तुमच्या उच्च स्थानांचा मी नाश करेन; तुमच्या धूपवेद्या मी मोडून टाकीन; तुमची प्रेते कुजण्यासाठी मी ती मूर्तीच्या समवेतच राहू देईन आणि मी तुमचा तिरस्कार करेन. तसेच मी तुमची शहरे उजाड करेन, तुमची पवित्रस्थाने ओसाड करेन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा सुवास घेणार नाही. मी देश ओसाड करेन, म्हणजे तुमचे शत्रू जे त्यात राहतील ते त्यामुळे गांगरून जातील. मी तुमची राष्ट्रांमध्ये पांगापांग करेन आणि मी माझी तलवार उगारून तुमच्या पाठीस लागेन. तुमचा देश उजाड होईल आणि तुमच्या शहरांचा नाश होईल. जेव्हा तुम्ही शत्रूंच्या देशात असाल, तुमचा देश उजाड होईल; तेव्हा भूमीला विश्रांती मिळेल व भूमी तिच्या शब्बाथ वर्षांचा संपूर्ण वेळ आनंद करेल. अनेक वर्षे ती उजाड होती, तुम्ही तिथे राहत असताना शब्बाथाच्या काळामध्ये तिला विश्रांती मिळाली नाही म्हणून ती आता विश्रांती घेईल. “ ‘तुमच्यातील जे उर्वरित राहतील, त्यांच्या शत्रूंच्या देशात मी त्यांची अंतःकरणे इतकी भयभीत करेन, की वार्‍याने उडून जाणार्‍या पानांचा आवाजसुद्धा त्यांना असा पळ काढावयास लावील की जणू एखादा तलवार घेऊन त्यांच्या पाठीशी लागला आहे आणि कोणीही त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते पडतील. कोणी पाठलाग करीत नसतानाही तलवार पाठीस लागल्याप्रमाणे अडखळून एकमेकांवर पडतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या शत्रूंसमोर उभे राहू शकणार नाही. तुम्ही राष्ट्रांत पांगून नाश पावाल; तुमच्या शत्रूंचा देश तुम्हाला गिळून टाकील. तुमच्यापैकी जे शिल्लक राहतील ते तुमच्या शत्रूंच्या देशात त्यांच्या पापांमुळे नष्ट होतील; आणि ते त्यांच्या पूर्वजांच्या पापांमुळे नष्ट होतील. “ ‘परंतु जर ते आपल्या पापांची व आपल्या वाडवडिलांच्या पापांची—त्यांच्या अविश्वासूपणाची आणि माझ्याविरुद्ध चालण्याची कबुली देतील, ज्यामुळे मी त्यांचा शत्रू झालो व त्यांना शत्रूच्या भूमीत घेऊन गेलो—नंतर जेव्हा त्यांची सुंता न झालेली हट्टी अंतःकरणे नम्र होतील आणि त्यांच्या पापाची शिक्षा ते भोगतील, तेव्हा मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर केलेल्या कराराचे स्मरण करेन आणि त्या भूमीचे स्मरण करेन. कारण ती भूमी ओसाड पडल्यामुळेच शब्बाथांचा आनंद उपभोगू शकत आहे. ते त्यांच्या पापांची परतफेड करतील कारण त्यांनी माझे नियम नाकारले आणि माझ्या विधींचा तिरस्कार केला. त्यांनी इतके केले असतानाही जेव्हा ते शत्रूंच्या देशात असतील, मी त्यांचा नकार करणार नाही किंवा नाश करणार नाही किंवा त्यांच्याशी केलेला करार मोडणार नाही. कारण मी याहवेह त्यांचा परमेश्वर आहे. परंतु त्यांचा परमेश्वर होण्याचा, त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार मी आठवेन. सर्व राष्ट्रे पाहत असताना मी त्यांच्या वाडवडिलांना इजिप्त देशाबाहेर घेऊन आलो होतो. मी याहवेह आहे.’ ” हे ते नियम, विधी व सूचना आहेत, ज्या याहवेहने आपल्यात व इस्राएली लोकांमध्ये मोशेद्वारे सीनाय पर्वतावर स्थापित केल्या.