लेवीय 23:39-41
लेवीय 23:39-41 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराप्रीत्यर्थ सण पाळावा; पहिला दिवस व आठवा दिवस हे परमविश्रामदिन होत. पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या झाडांची फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डाहळ्या, ओहळालगतची वाळुंजे ही आणून परमेश्वर तुमचा देव ह्याच्यासमोर सात दिवस उत्सव करावा. प्रतिवर्षी सात दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा.
लेवीय 23:39-41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसापर्यंत परमेश्वराकरिता सण पाळावा; त्यातील पहिला दिवस व आठवा दिवस हे विसाव्याचे दिवस म्हणून पाळावे. पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळूंज ही घेऊन तुमचा देव परमेश्वर यासमोर सात दिवस उत्सव करावा. प्रत्येक वर्षी सात दिवस परमेश्वराकरिता हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यानपिढ्या कायमचा नियम होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा.