यहोशवा 6:8-14
यहोशवा 6:8-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यहोशवाने लोकांस सांगितल्याप्रमाणे सात याजक परमेश्वर देवापुढे एडक्याच्या शिंगांचे सात कर्णे वाजवत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक कर्णे वाजविणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि कर्ण्याची गर्जना होत असताना पाठीमागचे संरक्षक सैन्य कराराच्या कोशाच्या मागोमाग येत होते. मग यहोशवाने लोकांस अशी आज्ञा केली की, मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका, “त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडातून एक शब्दही काढू नका; मग मी सांगेन तेव्हाच जयघोष करा.” या प्रकारे परमेश्वराच्या कराराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. यहोशवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कराराचा कोश उचलून घेतला. सात याजक एडक्याच्या शिंगांचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी वाजवीत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; कर्णे वाजवले जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कराराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले.
यहोशवा 6:8-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यहोशवाने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे सात याजक परमेश्वरापुढे सात रणशिंगे फुंकत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक रणशिंगे वाजवणार्या याजकांपुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. मग यहोशवाने लोकांना अशी आज्ञा केली की, “मी तुम्हांला सांगेपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका; आज्ञा होताच जयघोष करा.” ह्या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगरासभोवती एक वेळ प्रदक्षिणा झाली; त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तेथे रात्री मुक्काम केला. यहोशवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कोश उचलून घेतला. सात याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी फुंकत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्यापुढे चालले; रणशिंगे फुंकली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. ते दुसर्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले; असे त्यांनी सहा दिवस केले.