YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 6:1-5

यहोशवा 6:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

इस्राएल सैन्याच्या भीतीमुळे यरीहोची सर्व प्रवेशद्वारे मजबूत लावून घेण्यात आली होती; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे कसलेले योद्धे मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा. सात याजकांनी एडक्याच्या शिंगाचे सात कर्णे घेऊन कराराच्या कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी कर्णे वाजवावेत, नंतर ते एडक्याच्या शिंगाच्या कर्ण्यानी दीर्घ नाद करतील आणि जेव्हा तुम्ही कर्ण्याचा आवाज ऐकाल तेव्हा सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा म्हणजे नगराच्या भिंती जागच्या जागी कोसळतील; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.”

सामायिक करा
यहोशवा 6 वाचा

यहोशवा 6:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

(इस्राएल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही.) परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे ह्या नगरासभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे सहा दिवस करा. सात याजकांनी सात रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावीत. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल; मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे.”

सामायिक करा
यहोशवा 6 वाचा