यहोशवा 19:49-51
यहोशवा 19:49-51 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएल लोकांनी देशाच्या सीमांप्रमाणे वतन करून घेण्याची समाप्ती केल्यावर नूनाचा पुत्र यहोशवा याला आपल्यांमध्ये वतन दिले. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राइम डोंगरावरचे तिम्नाथ-सेरह नगर, जे त्याने मागितले, मग तो ते नगर बांधून त्यामध्ये राहिला. एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएलाच्या वंशांतले वडील अधिकारी यांनी शिलोमध्ये दर्शनमंडपाच्या दारी परमेश्वरासमोर, चिठ्ठ्या टाकून जी वतने वाटून दिली ती ही; याप्रमाणे त्यांनी देश वाटून देण्याचे संपले.
यहोशवा 19:49-51 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा त्यांनी त्यांना दिलेल्या भागाची वाटणी करण्याचे संपविले, तेव्हा इस्राएली लोकांनी नूनाचा पुत्र यहोशुआला आपल्या वतनामध्ये वाटा दिला, याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह नगर जे यहोशुआने मागितले होते ते त्याला दिले आणि त्याने ते नगर बांधून त्यात वस्ती केली. या वतनसीमा एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुळांच्या पुढार्यांनी शिलोह येथे सभामंडपाच्या प्रवेशद्वारात याहवेहच्या उपस्थितीत नेमून दिली. अशाप्रकारे त्यांनी देशाची वाटणी करण्याचे काम संपविले.
यहोशवा 19:49-51 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
वरील सीमांप्रमाणे देशातील वतनांची वाटणी संपवल्यावर इस्राएल लोकांनी नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला आपल्या वतनामध्ये वाटा दिला. त्याने मागितल्याप्रमाणे एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह हे नगर त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्याला दिले. मग ते नगर बांधून तो त्यात राहू लागला. एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा आणि इस्राएलाच्या वंशांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांनी शिलो येथे दर्शनमंडपाच्या द्वारी परमेश्वरासमोर चिठ्ठ्या टाकून ही वतने वाटून दिली. ह्याप्रमाणे देश वाटून देण्याचे संपले.