YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशुआ 19:49-51

यहोशुआ 19:49-51 MRCV

जेव्हा त्यांनी त्यांना दिलेल्या भागाची वाटणी करण्याचे संपविले, तेव्हा इस्राएली लोकांनी नूनाचा पुत्र यहोशुआला आपल्या वतनामध्ये वाटा दिला, याहवेहच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्नाथ-सेरह नगर जे यहोशुआने मागितले होते ते त्याला दिले आणि त्याने ते नगर बांधून त्यात वस्ती केली. या वतनसीमा एलअज़ार याजक, नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुळांच्या पुढार्‍यांनी शिलोह येथे सभामंडपाच्या प्रवेशद्वारात याहवेहच्या उपस्थितीत नेमून दिली. अशाप्रकारे त्यांनी देशाची वाटणी करण्याचे काम संपविले.

यहोशुआ 19 वाचा