ईयोब 38:37-41
ईयोब 38:37-41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ढग मोजण्याइतका विद्वान कोण आहे? त्यांना पाऊस पाडायला कोण सांगतो? त्यामुळे धुळीचा चिखल होतो आणि धुळीचे लोट एकमेकास चिकटतात. तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का? त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का? ते सिंह त्यांच्या गुहेत झोपतात. ते गवतावर दबा धरुन बसतात आणि भक्ष्यावर तुटून पडतात. कावळ्याला कोण अन्न देतो? जेव्हा त्याची पिल्ले देवाकडे याचना करतात आणि अन्नासाठी चारी दिशा भटकतात तेव्हा त्यांना कोण अन्न पुरवतो?
ईयोब 38:37-41 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कोणाला आपल्या बुद्धिसामर्थ्याने मेघांची हजेरी घेता येते? आकाशाचे बुधले कोण ओततो? तेव्हा धूळ भिजून गोळा बनतो. व ढेकळे विरघळून एकमेकांना चिकटून जातात. तुला सिंहिणीची शिकार करता येते काय? तरुण सिंहाची क्षुधा तुला तृप्त करता येते काय? ते गुहांत दबा धरून बसतात, जाळीत दडून टपून बसतात. कावळ्याची पिले देवाला हाका मारतात; ती अन्नान्न करीत चोहोकडे भटकतात.