YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 36:1-21

ईयोब 36:1-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अलीहू आपले भाषण पुढे चालवून म्हणाला, “अंमळ थांब; देवाच्या वतीने आणखी काही बोलण्याजोगे आहे, असे मी तुला दाखवतो. मी दुरून आपले ज्ञान आणून आपल्या उत्पन्नकर्त्याचे न्याय्यत्व स्थापित करीन. माझे शब्द वास्तविक खोटे नाहीत; हा पूर्ण ज्ञानी पुरुष तुझ्यापुढे उभा आहे. पाहा, देव समर्थ आहे तरी तो कोणाला तुच्छ मानत नाही; त्याचे ज्ञानबल प्रचंड आहे. तो अधर्म्यांना वाचवत नाही; तो दीनांचा न्याय करतो. तो नीतिमानांवरील आपली दृष्टी काढत नाही, तर त्यांना राजांबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापतो, व त्यांची उन्नती होते. त्यांना बेड्यांनी जखडले, दुःखरूप रज्जूंनी त्यांना बांधून ठेवले, तर त्यांची कृती व त्यांचे अपराध ह्यांची त्यांना जाणीव करून देतो, त्यांनी उन्मत्तपणाचे वर्तन केले असे त्यांना दाखवून देतो. त्यांचे कान उघडून ते बोध घेतील असे तो करतो, आणि त्यांना अधर्म सोडायला सांगतो. हे ऐकून ते अंकित झाले तर ते आपले दिवस सुस्थितीत घालवतील, आपली वर्षे सुखाने काढतील; पण त्यांनी ऐकले नाही तर ते शस्त्राने ठार होतील; ज्ञानप्राप्तीवाचून त्यांचा प्राणान्त होईल. जे मनाने अधर्मी असतात ते हृदयात क्रोध बाळगतात; त्याने त्यांना बांधले असता ते धावा करीत नाहीत. ते भरज्वानीत मरतात; त्यांचा प्राण अमंगळ पुरुषांप्रमाणे नाश पावतो; तो दुःखितांना त्यांच्या दुःखाच्या द्वारे सोडवतो; विपत्तीच्या द्वारे त्यांची कानउघाडणी करतो. तो तुलाही दुःखाच्या जबड्यातून सोडवून संकोच नाही अशा प्रशस्त स्थली नेतो; तुझ्या मेजावर मिष्टान्नाची रेलचेल होईल. तू दुष्टांसारखा दोषारोप करीत राहशील; तर दोषारोप व न्यायदंड ह्यांच्या तावडीत तू सापडशील. आपल्या क्रोधाने मोहात पडून तू अपमान करण्यास प्रवृत्त होऊ नकोस; हा खंड भारी आहे म्हणून बहकू नकोस. तुझ्या अपार संपत्तीचा तुझ्या संपत्तीच्या सार्‍या बळाचा काही उपयोग होईल काय? लोक जागच्या जागी नष्ट होतील अशा रात्रीची उत्कंठा धरू नकोस. सांभाळ, दुष्टतेकडे वळू नकोस; ती तुला दुःखापेक्षा पसंत वाटत आहे.

सामायिक करा
ईयोब 36 वाचा

ईयोब 36:1-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला, “तू मला आणखी थोडे बोलण्याची परवानगी दे कारण मला देवाच्या बाजूने आणखी बोलायचे आहे. मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन. खरोखर, माझे शब्द खोटे असणार नाहीत, कोणीतरी ज्ञानाने समजूतदार असा तुम्हाबरोबर आहे. देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे. तो दुष्टांना वाचवीत नाही, तर तो त्याऐवजी जे दुःखात आहेत त्यांच्यासाठी चांगले ते करतो. जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. तो चांगल्या लोकांस राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव उंच करतो. जर, साखळदंडानी ठेवले, जर त्यांना त्रासाच्या दोऱ्यांनी बांधून ठेवले आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल. देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे. देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल. तो त्यांचे कान त्याच्या सूचना ऐकण्यास उघडतो, तो त्यांना अन्यायापासून मागे वळवतो. जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची उपासना करतील, तर ते त्यांचे दिवस सुखाने घालतील. परंतु जर त्यांनी ऐकले नाही तर ते तलवारीने नाश पावतील, त्यांना ज्ञान न होता मरण येईल. जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात. देवाने जरी त्यांना बांधले तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात. ते अगदी तरुणपणी मरतील, त्यांचे जीवन कंलकीत होऊन संपेल. परंतु देव दु:खी लोकांस त्यांच्या दु:खातून सोडवील विपत्तीच्या द्वारे कानउघडणी करतो. खरोखर, त्यास तुला दुःखातून काढायला आवडते व अडचण नसलेल्या मोकळ्या जागी नेतो, आणि तुझ्या जेवणाच्या टेबलावर भरपूर पौष्टीक अन्न ठेवले असते. परंतु आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे, दोषारोप व न्याय तुलाच धरतात. तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस. लाच तुला न पकडो आणि न्यायापासून दूर घेवून जावो. आता तुझ्या सपंत्तीचा तुला काही नफा होईल काय, म्हणजे तू दुःखी होणार नाहीस किंवा तुझ्या सर्व सामर्थ्याचा तुला काही उपयोग होईल काय? दुसऱ्या विरूद्ध पाप करण्यास तू रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस, लोक रात्री पसार होण्याची वेळ प्रयत्न करतात. काळजीपूर्वक रहा पापाकडे वळू नकोस. कारण तुझी त्रासातून परीक्षा झाली आहे, म्हणून तू पापापासुन दूर रहा.

सामायिक करा
ईयोब 36 वाचा

ईयोब 36:1-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

एलीहू पुढे म्हणाला: “अजून थोडा वेळ माझ्याशी धीर धरून राहा आणि मी तुला दाखवेन की परमेश्वराच्या बाजूने मला आणखी पुष्कळ बोलायचे आहे. माझे ज्ञान मला फार दुरून मिळते; माझ्या निर्माणकर्त्याचे न्यायीपण मी वर्णन करून सांगेन. ही खात्री करून घे की माझे शब्द खोटे नाहीत; ज्याच्याकडे परिपूर्ण ज्ञान आहे तो तुझ्याबरोबर आहे. “परमेश्वर सामर्थ्यवान आहे, परंतु कोणाचा तिरस्कार करीत नाही; ते बलवान असून त्यांच्या योजनांमध्ये स्थिर आहेत. दुष्टांना ते जिवंत ठेवत नाही परंतु पीडितांना त्यांचे हक्क देतात. न्यायी मनुष्यावरून त्यांची नजर सरकत नाही; राजांबरोबर त्यांना ते राजासनावर बसवितात आणि सर्वकाळासाठी त्यांना थोर बनवितात. परंतु जर लोक साखळ्यांनी बांधलेले आहेत, आणि दुःखाच्या दोरखंडात जखडलेले आहेत, त्यांनी काय केले आहे हे परमेश्वर त्यांना सांगतात— त्यांनी गर्विष्ठपणात पाप केले आहे. ते त्यांना सुधारणा ऐकून घेण्यास भाग पाडतात आणि त्यांनी केलेल्या पापांसाठी पश्चात्ताप करण्याची आज्ञा करतात. जर त्यांनी आज्ञा पाळल्या आणि परमेश्वराची सेवा केली, तर त्यांच्या आयुष्याचे बाकीचे दिवस ते समृद्धीत घालवतील आणि संतृप्तीची वर्षे बघतील. परंतु जर ते ऐकणार नाहीत, तर तलवारीने ते नाश होतील आणि ज्ञाना अभावी मरण पावतील. “देवहीन हृदयाचे लोक संताप साठवून ठेवतात; त्यांना बेड्या बांधल्या, तरी ते मदतीसाठी रडत नाही. त्यांच्या भर तारुण्यातच मंदिरांना जीवन समर्पित असलेल्या पुरुषगामींसह ते मरण पावतात. परंतु जे क्लेश सहन करतात त्यांना परमेश्वर क्लेशातून मुक्त करतात; त्यांच्या दुःखात ते त्यांच्याशी बोलतात. “दुःखाच्या जाभाड्यातून ते तुला निमंत्रण देतात आणि विशाल व मर्यादा नसलेल्या ठिकाणी, तुझ्या आरामदायी मेजावर मिष्टान्नांनी परमेश्वर तुला तृप्त करतात. परंतु आता दुष्टांमुळे तुझ्यावर दंड लादला आहे; शिक्षा आणि न्याय यांनी तुझी पकड घेतली आहे. सावध राहा की कोणीही आपल्या श्रीमंतीने तुला भुरळ पाडू नये; आणि मोठी लाच देऊन तुला कोणी भटकू देऊ नये. तुझी श्रीमंती किंवा तुझे शक्तिशाली प्रयत्न संकटात पडण्यापासून तुला उचलून धरतील काय? लोकांना त्यांच्या घरातून ओढून दूर नेण्यासाठी, रात्रीच्या समयाची इच्छा करू नकोस. दुष्टतेकडे तू वळणार नाहीस याची काळजी घे, कारण असेच दिसते की तू कष्टापेक्षा दुष्टतेची निवड करतोस.