ईयोब 32:6-9
ईयोब 32:6-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याने उत्तर दिले, तो म्हणाला, मी तरूण आहे व तुम्ही वृद्ध आहात. म्हणून मी तुम्हास बोलण्याची हिम्मत केली नाही आणि माझे मत बोलून दाखवले नाही. मी म्हणालो, जास्त दिवस पाहिलेल्यांनी बोलले पाहीजे, जास्त वर्ष घातलेल्यांनी ज्ञान शिकवावे. परंतु देवाचा आत्मा मनुष्यात असतो, सर्वसमर्थाचा श्वास त्यास समजबुद्धी देतो. मनुष्य महान असला म्हणजेच तो ज्ञानी असतो असे नाही, जे वयाने मोठे आहेत त्यांनाच न्यायाची जाण आहे असेही नाही.
ईयोब 32:6-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि बूजी बारकाएलचा पुत्र एलीहू बोलला: “मी वयाने लहान आहे, व आपण वयोवृद्ध आहात; म्हणूनच मी घाबरलो, आणि मला जे माहीत आहे ते सांगण्याचे धाडस केले नाही; मला वाटले की, ‘वयाने मोठे असलेल्यांनी बोलावे; प्रौढ असलेल्यांनी ज्ञान शिकवावे.’ परंतु व्यक्तीमध्ये असलेला तो आत्मा, आणि सर्वसमर्थाचा श्वासच आहे की जो शहाणपण देतो. जे वयाने मोठे तेच ज्ञानी आहेत असे नसते, जे योग्य ते केवळ वृद्धांनाच समजते असेही नाही.
ईयोब 32:6-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग बरखेल बूजी ह्याचा पुत्र अलीहू ह्याने उत्तर दिले; तो म्हणाला, “मी अल्पवयी आहे व तुम्ही वयोवृद्ध आहात; म्हणून मी मुरवत धरली; आपले मत तुमच्यापुढे प्रकट करण्यास मी कचरलो. मला वाटले, जास्त दिवस पाहिलेल्यांनी भाषण करावे, बहुत वर्षे घालवलेल्यांनी अक्कल सांगावी; पण मानवाच्या ठायी आत्मा असतो; सर्वसमर्थाचा श्वास त्याला बुद्धी देतो. माणसे वयाने मोठी असली तरच ती ज्ञानी असतात, वयोवृद्ध असली तरच त्यांना खरेखोटे समजते, असे नाही.