योहान 17:6-9
योहान 17:6-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले; ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस; आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहेस ते सर्व तुझ्यापासून आहे. कारण जी वचने तू मला दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली; मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवलेस असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो; मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी; कारण ते तुझे आहेत.
योहान 17:6-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, तू ज्या गोष्टी मला दिल्यास त्या सर्व तुझ्यापासून आहेत. कारण तू मला जी वचने दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवले. असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत.
योहान 17:6-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“तुम्ही मला या जगातील जे लोक दिले, त्यांच्यासमोर मी तुम्हाला प्रगट केले आहे. ते तुमचे होते; तुम्ही ते सर्वजण मला दिले आणि त्यांनी तुमचे वचन पाळले आहे. आता त्यांना कळले आहे की, जे काही तुम्ही मला दिले आहे ते तुमच्यापासून आहे. कारण तुम्ही मला दिलेली वचने मी त्यांना दिली आणि त्यांनी ती स्वीकारली आहेत. त्यांना खात्रीपूर्वक समजले की मी तुमच्यापासून आलो आणि तुम्ही मला पाठविले आहे. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे. मी जगासाठी प्रार्थना करीत नाही, परंतु जे तुम्ही मला दिले आहेत आणि ते आपले आहेत त्यांच्यासाठी करतो.
योहान 17:6-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले; ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस; आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहेस ते सर्व तुझ्यापासून आहे. कारण जी वचने तू मला दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली; मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवलेस असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो; मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी; कारण ते तुझे आहेत.
योहान 17:6-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले आहे. ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस. त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहेस, ते सर्व तुझ्याकडून आले आहे. जी वचने तू मला दिलीस, ती मी त्यांना दिली आहेत. ती त्यांनी स्वीकारली. मी तुझ्याकडून आलो, हे ते ओळखतात आणि तू मला पाठवले आहेस, असा ते विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी मी विनंती करतो. मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी, कारण ते तुझे आहेत.