YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 17:6-9

योहान 17:6-9 MRCV

“तुम्ही मला या जगातील जे लोक दिले, त्यांच्यासमोर मी तुम्हाला प्रगट केले आहे. ते तुमचे होते; तुम्ही ते सर्वजण मला दिले आणि त्यांनी तुमचे वचन पाळले आहे. आता त्यांना कळले आहे की, जे काही तुम्ही मला दिले आहे ते तुमच्यापासून आहे. कारण तुम्ही मला दिलेली वचने मी त्यांना दिली आणि त्यांनी ती स्वीकारली आहेत. त्यांना खात्रीपूर्वक समजले की मी तुमच्यापासून आलो आणि तुम्ही मला पाठविले आहे. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे. मी जगासाठी प्रार्थना करीत नाही, परंतु जे तुम्ही मला दिले आहेत आणि ते आपले आहेत त्यांच्यासाठी करतो.

योहान 17:6-9 साठी चलचित्र