YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 12:37-41

योहान 12:37-41 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असताही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; हे ह्यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे : “प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?” ह्यामुळे त्यांना विश्वास ठेवता आला नाही; ह्या कारणाने यशया आणखी म्हणाला : “त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये. म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.” यशयाने त्याचा गौरव पाहिला म्हणून तो असे म्हणाला आणि त्याच्याविषयी बोलला.

सामायिक करा
योहान 12 वाचा

योहान 12:37-41 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतांही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; हे यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असेः “प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रकट झाला आहे?” म्हणून त्यांना विश्वास ठेवता आला नाही; या कारणाने यशया पुन्हा म्हणाला, “त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व अंतःकरण कठीण केले आहे.” यशयाने त्याचे गौरव पाहिले म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आणि तो त्याच्याविषयी बोलला.

सामायिक करा
योहान 12 वाचा

योहान 12:37-41 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशूंनी अनेक चिन्हे त्यांच्यासमोर केली असतानाही, ते त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. नेमके हेच भविष्य यशया संदेष्ट्याने वर्तविले होते, ते पूर्ण झाले: “प्रभू, आमच्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे आणि प्रभुचा हात कोणावर प्रकट झाला आहे?” परंतु या कारणाने ते विश्वास ठेवू शकत नव्हते, कारण, यशयाने इतरत्र असेही म्हटले आहे: “परमेश्वराने त्यांचे डोळे आंधळे केले होते आणि त्यांची हृदये कठोर केली होती, आणि म्हणून त्यांना डोळ्यांनी पाहता येत नाही, किंवा मनाने समजून घेता येत नाही, किंवा बरे होण्यासाठी माझ्याकडे येताही येत नाही.” यशयाने येशूंचे गौरव पाहिले म्हणून तो त्यांच्याविषयी बोलला.

सामायिक करा
योहान 12 वाचा

योहान 12:37-41 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतानाही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. हे ह्यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते, ते पूर्ण व्हावे, ते असे: प्रभो, आम्ही सांगितलेल्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचे सामर्थ्य कोणाला प्रकट झाले आहे? तसेच त्यांना विश्वास ठेवता आला नाही, कारण यशया आणखी म्हणाला: त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, माझ्याकडे वळू नये व मी त्यांना बरे करू नये, म्हणून देवाने त्यांचे डोळे आंधळे व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे. यशयाने येशूचे वैभव पाहिले म्हणून त्याच्याविषयी तो असे बोलला.

सामायिक करा
योहान 12 वाचा