येशूंनी अनेक चिन्हे त्यांच्यासमोर केली असतानाही, ते त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. नेमके हेच भविष्य यशया संदेष्ट्याने वर्तविले होते, ते पूर्ण झाले: “प्रभू, आमच्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे आणि प्रभुचा हात कोणावर प्रकट झाला आहे?” परंतु या कारणाने ते विश्वास ठेवू शकत नव्हते, कारण, यशयाने इतरत्र असेही म्हटले आहे: “परमेश्वराने त्यांचे डोळे आंधळे केले होते आणि त्यांची हृदये कठोर केली होती, आणि म्हणून त्यांना डोळ्यांनी पाहता येत नाही, किंवा मनाने समजून घेता येत नाही, किंवा बरे होण्यासाठी माझ्याकडे येताही येत नाही.” यशयाने येशूंचे गौरव पाहिले म्हणून तो त्यांच्याविषयी बोलला.
योहान 12 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 12:37-41
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ