योहान 10:1-11
योहान 10:1-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो मेंढवाड्यांत दरवाजातून न जातां दुसरीकडून चढून जातो, तो चोर आणि लुटारू आहे. जो दरवाजाने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाल दरवाजा उघडतो आणि मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो; आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याचा वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहीत.” येशूने त्यांना हा दाखला सांगितला. तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मी मेंढरांचे द्वार आहे. जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर आणि लुटारू आहेत, त्याचे मेंढरांनी ऐकले नाही. मी द्वार आहे; माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल; तो आत येईल आणि बाहेर जाईल आणि त्यास खावयास मिळेल. चोर तर, तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो.
योहान 10:1-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“परूश्यांनो मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो कोणी मेंढवाड्यात दारातून आत प्रवेश करत नाही आणि दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारु असला पाहिजे. जो दाराने आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ आहे. दारावरचा पहारेकरी त्याच्यासाठी दार उघडतो आणि मेंढरे त्यांची वाणी ओळखतात. तो आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर घेऊन जातो. आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर, तो त्यांच्यापुढे चालतो, व मेंढरे त्याला अनुसरतात, कारण ती त्यांची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत; उलट ती त्याच्यापासून दूर पळून जातील, कारण ती त्या परक्याची वाणी ओळखीत नाहीत.” येशू हे अलंकारिकरित्या बोलले, परंतु परूश्यांना ते समजले नाही. यास्तव येशू त्यांना पुन्हा म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे. जे सर्व माझ्यापूर्वी आले होते ते सर्व चोर व लुटारु होते, मेंढरांनी त्यांचे ऐकले नाही. मीच दार आहे; जो कोणी माझ्याद्वारे प्रवेश करतो त्याचे तारण होईल. ते आत येतील व बाहेर जातील आणि त्यांना कुरणे आढळतील. चोर केवळ चोरी, घात आणि नाश करण्यास येतो; मी त्यांना जीवन मिळावे व ते विपुलपणे मिळावे म्हणून आलो आहे. “मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला जीव देतो.
योहान 10:1-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो; मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या-त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखत नाहीत.” हा दृष्टान्त येशूने त्यांना सांगितला, तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत; त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे. माझ्या द्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणप्राप्ती होईल; तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो; मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो.
योहान 10:1-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो मेंढवाड्यात दारातून न जाता दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू असतो. जो दारातून आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ असतो. त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, उलट ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखत नाहीत.” हा दाखला येशूने त्यांना सांगितला. परंतु येशू त्यांना जे सांगत होता, ते त्यांना समजले नाही. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी मेंढरांसाठी दार आहे. जे माझ्या पूर्वी आले, ते सर्व चोर व लुटारू होते. त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याचे तारण होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला कुरण सापडेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करायला येतो. मी तर त्यांना जीवन व तेही परिपूर्ण जीवन मिळावे म्हणून आलो आहे. मी चांगला मेंढपाळ आहे, चांगला मेंढपाळ मेंढरांकरता आपला प्राण देतो.