“परूश्यांनो मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो कोणी मेंढवाड्यात दारातून आत प्रवेश करत नाही आणि दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारु असला पाहिजे. जो दाराने आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ आहे. दारावरचा पहारेकरी त्याच्यासाठी दार उघडतो आणि मेंढरे त्यांची वाणी ओळखतात. तो आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर घेऊन जातो. आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर, तो त्यांच्यापुढे चालतो, व मेंढरे त्याला अनुसरतात, कारण ती त्यांची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत; उलट ती त्याच्यापासून दूर पळून जातील, कारण ती त्या परक्याची वाणी ओळखीत नाहीत.” येशू हे अलंकारिकरित्या बोलले, परंतु परूश्यांना ते समजले नाही. यास्तव येशू त्यांना पुन्हा म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे. जे सर्व माझ्यापूर्वी आले होते ते सर्व चोर व लुटारु होते, मेंढरांनी त्यांचे ऐकले नाही. मीच दार आहे; जो कोणी माझ्याद्वारे प्रवेश करतो त्याचे तारण होईल. ते आत येतील व बाहेर जातील आणि त्यांना कुरणे आढळतील. चोर केवळ चोरी, घात आणि नाश करण्यास येतो; मी त्यांना जीवन मिळावे व ते विपुलपणे मिळावे म्हणून आलो आहे. “मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला जीव देतो.
योहान 10 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 10:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ