यिर्मया 9:7-9
यिर्मया 9:7-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो: पाहा! मी त्यांची परिक्षा घेईल आणि त्यांना तपासून पाहीन. कारण मी आपल्या लोकांच्या कन्येकरिता आणखी काय करू? त्यांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. त्या अविश्वासू गोष्टी बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे ते शेजाऱ्यावर टपून असतात. या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा करणार नाही काय? “अशा गोष्टींविषयी या राष्ट्रावर मी सूड उगवू नये का? परमेश्वर असे म्हणतो.
यिर्मया 9:7-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “पाहा, मी यांना शुद्ध करेन व पारखेन, याशिवाय यांचे मी दुसरे काय करणार याचे कारण माझ्या लोकांची पापेच नव्हे काय? त्यांच्या जिभा विषारी बाणांप्रमाणे आहेत; ते असत्य वचने बोलतात. त्यांच्या मुखाने ते त्यांच्या शेजाऱ्यांशी सलोख्याने बोलतात, परंतु मनात ते त्यांना पाशात अडकविण्याची योजना करतात. अशा गोष्टीबद्दल मी त्यांना शासन करू नये का?” अशी याहवेह घोषणा करतात. “या अशा राष्ट्रावर मी स्वतः सूड उगवू नये काय?”
यिर्मया 9:7-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यासाठी सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी त्यांना गाळून पारखीन; माझ्या लोकांच्या कन्येच्या वर्तनास्तव मी दुसरे काय करणार? त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे; ते असत्य बोलतात; ते तोंडाने शेजार्याशी सलोख्याचे भाषण करतात, पण अंतर्यामी त्याच्यावर टपून असतात. परमेश्वर म्हणतो, ह्याबद्दल मी त्यांचा समाचार घेणार नाही काय? माझा आत्मा ह्या राष्ट्राचे पारिपत्य करणार नाही काय?