यिर्मया 31:15-40
यिर्मया 31:15-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर असे म्हणतो, “रामात शोक व आकांत ह्यांचा शब्द ऐकू येत आहे; राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे; आपल्या मुलांमुळे ती सांत्वन पावत नाही, कारण ती नाहीत.” परमेश्वर असे म्हणतो, “तू आपला शब्द रडण्यापासून आणि आपले डोळे अश्रुपातापासून आवर; कारण तुझ्या श्रमाचे फळ तुला मिळेल; ते शत्रूंच्या देशांतून परत येतील, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, तुला भावी सुस्थितीची आशा आहे; तुझी मुले आपल्या सीमेच्या आत परत येतील. मी एफ्राइमास खरोखर असा विलाप करताना ऐकले आहे की, ‘बेबंद वासरासारखा जो मी, त्या मला तू शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली; तू मला वळव म्हणजे मी वळेन; कारण हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस. मी वळल्यावर पश्चात्ताप केला; मला बोधप्राप्ती घडल्यावर मी ऊर1 बडवू लागलो; माझ्या तारुण्यातील अपकीर्तीच्या भारामुळे मी लज्जित व फजीत झालो आहे.’ एफ्राईम माझा प्रिय पुत्र आहे ना? तो माझा लाडका मुलगा आहे ना? मी वारंवार त्याच्याविरुद्ध बोलतो तरी मी त्याची आठवण करीतच असतो; म्हणून माझी आतडी त्याच्यासाठी कळवळतात; मी त्याच्यावर दया करीनच करीन, असे परमेश्वर म्हणतो. वाटेवर आपल्यासाठी खुणा कर; खुणेचे खांब उभे कर; ज्या मार्गाने तू गेलीस त्या सडकेवर आपले चित्त ठेव; हे इस्राएलाच्या कुमारी, परत ये, तुझ्या ह्या नगरास परत ये. हे मला सोडून जाणार्या कन्ये, तू कोठवर इकडेतिकडे भटकशील? परमेश्वराने तर पृथ्वीवर अजब प्रकार केला आहे; स्त्री पुरुषाच्या मागे लागेल.” सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो की, “मी यहूदा देशाचा व त्यातील नगरांचा बंदिवास उलटवीन तेव्हा ह्या देशात लोक पुन्हा हे आशीर्वचन म्हणतील : हे नीति-मत्तेच्या निवासा, पावित्र्याच्या गिरी, परमेश्वर तुझे कल्याण करो! यहूदा व त्यातील सर्व नगरे ह्यांतले लोक शेतकरी व मेंढरांचे कळप घेऊन फिरणारे असे तेथे एकत्र राहतील. कारण श्रांत जिवास मी तृप्त केले आहे, प्रत्येक म्लान हृदयास पुन्हा भरून काढले आहे.” ह्यानंतर मी जागा होऊन पाहतो तर ही माझी निद्रा मला गोड अशी भासली. परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी इस्राएलाच्या घराण्यात व यहूदाच्या घराण्यात मनुष्यबीज व पशुबीज पेरीन. आणि असे होईल की उपटण्याच्या व मोडून टाकण्याच्या, पाडून टाकण्याच्या व नाश करण्याच्या आणि पीडा करण्याच्या कामी मी जशी त्यांच्यावर नजर ठेवली तशी बांधून काढण्याच्या व लागवड करण्याच्या कामी मी त्यांच्यावर नजर ठेवीन, असे परमेश्वर म्हणतो. ‘बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले,’ असे त्या काळी लोक म्हणणार नाहीत. तर प्रत्येक मनुष्य आपल्याच दुष्कर्मामुळे मरेल. जो कोणी आंबट द्राक्षे खाईल त्याचेच दांत आंबतील. परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन; परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही; मी त्याच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा : मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृत्पटलावर लिहीन; मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. परमेश्वर म्हणतो, ह्यापुढे कोणी आपल्या शेजार्यास, कोणी आपल्या बंधूस, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही.” जो परमेश्वर दिवसा प्रकाशासाठी सूर्य देतो व रात्री प्रकाशासाठी चंद्र व नक्षत्रे ह्यांचे नियम लावून देतो, जो समुद्रास खवळवतो म्हणजे त्याच्या लाटा गर्जतात, ज्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे, तो असे म्हणतो की, “यदाकदाचित माझ्यासमोरून हे नियम ढळलेच तर इस्राएलाचा वंश माझ्यासमक्ष राष्ट्र ह्या पदापासून अक्षय ढळेल.” परमेश्वर म्हणतो, वर आकाशाचे मापन करणे व खाली पृथ्वीच्या पायांचा थांग लावणे हे साध्य असले तरच इस्राएलाच्या वंशाने जे काही केले त्या सर्वांमुळे मी त्या सगळ्या वंशांचा त्याग करीन, असे परमेश्वर म्हणतो. “परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत परमेश्वरासाठी हानानेलाच्या बुरुजापासून कोपर्याच्या वेशीपर्यंत नगर बांधून काढतील; आणि मापनसूत्र पुन्हा एकदा थेट गारेबाच्या टेकडीवर लागेल व तेथून गवाथाकडे वळसा घेईल. प्रेतांचे व राखेचे सर्व खोरे आणि किद्रोन ओहोळापर्यंत पूर्वेकडील घोडेवेशीच्या कोपर्यापर्यंत सर्व शेते परमेश्वराला पवित्र होतील; पुन्हा कधीही ती उपटण्यात येणार नाहीत किंवा मोडून टाकणार नाहीत.”
यिर्मया 31:15-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर असे म्हणतो, “रामांत विलाप आणि अतिखेदाचे रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे. ती नाहीत म्हणून सांत्वन पावत नाही.” परमेश्वर असे म्हणतो, तू रडण्यापासून आपला आवाज आणि आपले डोळे आसवांपासून आवर. कारण तुझ्या दुःखाचे प्रतिफळ तुला मिळेल. असे परमेश्वर म्हणतो. तुझी मुले शत्रूंच्या देशातून परत येतील. परमेश्वर असे म्हणत आहे, “तुझ्या भविष्यासाठी तुला आशा आहे.” “तुझे वंशज आपल्या सीमेत परत येतील. खचीत मी एफ्राईमाला असे रडताना ऐकले आहे की, ‘तू मला शिक्षा केलीस आणि मला शिक्षा झाली. अप्रशिक्षीत वासराप्रमाणे मला परत माघारी आण आणि मी परत येईन, कारण परमेश्वरा, तू माझा देव आहेस. कारण मी तुझ्यापासून भटकल्यानंतर, मी पश्चाताप केला. मला शिक्षण मिळाल्यानंतर, मी दुःखात आपल्या छातीवर थापा मारल्या. कारण माझ्या तरुणपणातील अपराधाच्या अपकीर्तीमुळे मी लज्जित व शरमिंदा झालो.” एफ्राईम माझे बहुमूल्य मुल नाही काय? तो माझा प्रिय मोहक मुलगा नाही का? कारण जरी कधी मी त्याच्याविरुध्द बोललो, तरी खचित मी त्यास आपल्या मनात प्रेमाने आठवण करीतच असतो. याप्रकारे माझे हृदय त्याच्यासाठी कळवळते. मी खरोखर त्याच्यावर दया करीन. असे परमेश्वर म्हणतो. तू आपल्यासाठी रस्त्यांवर खुणा कर. तू आपल्यासाठी मार्गदर्शक खांब ठेव. तू जो योग्य मार्ग घेतला, त्या मार्गावर आपले लक्ष ठेव. हे इस्राएला! कुमारी, तू आपल्या नगराकडे परत ये. विश्वासहीन मुली, तू किती वेळ सतत हेलकावे घेशील? कारण परमेश्वराने पृथ्वीवर काहीतरी नवे निर्माण केले आहे. स्त्री तिच्या रक्षणासाठी बलवान पुरुषाला घेरील. सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी लोकांस परत त्यांच्या देशात आणीन, यहूदाच्या नगरांत व देशात राहणारे ते हे म्हणतील, ‘तुझी धार्मिकतेची जागा जेथे तो राहतो, तू पवित्र पर्वता, परमेश्वर तुझे कल्याण करो! कारण यहूदा आणि त्याची सर्व नगरे एकत्र राहतील. तेथे शेतकरी आणि मेंढपाळ त्याच्या कळपाबरोबर राहतील. कारण मी थकलेल्यांना पिण्यास पाणी देईन आणि तहानेने व्याकुळ झालेल्या प्रत्येक जीवास भरेन. यानंतर, मी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की, माझी झोप ताजीतवानी करणारी होती. परमेश्वराचे म्हणणे असे आहे. “पाहा, असे दिवस येत आहेत की ज्यात मी यहूदाच्या व इस्राएलाच्या घराण्यांत मनुष्यबीज आणि पशुबीज पेरीन. मग असे होईल की, उपटायला व पाडायला, मोडायला व नाशाला, व पीडायला जशी मी त्यांच्यावर नजर ठेवत असे, तशी बांधायला व लावायला मी त्यांच्यावर नजर ठेवीत जाईन.” असे परमेश्वर म्हणतो. “त्या दिवसात कोणीही पुन्हा असे म्हणणार नाहीत की, वडिलाने आंबट द्राक्षे खाल्ली, पण मुलांचे दात आंबले आहेत. कारण प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या अन्यायात मरेल. जो प्रत्येकजण आंबट द्राक्षे खाईल, त्याचेच दात आंबतील.” परमेश्वर असे म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, “मी इस्राएलाच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करीन. मी त्यांच्या वडीलांबरोबर मिसर देशातून बाहेर काढून आणण्यासाठी त्यांचा हात धरला तेव्हा जो करार केला होता त्याप्रमाणे हा असणार नाही. त्या दिवसात जरी मी त्यांच्यासाठी पती होतो तरी त्यांनी माझ्या कराराचा भंग केला.” असे परमेश्वर म्हणतो. “पण परमेश्वर म्हणतो, त्यादिवसानंतर जो करार मी इस्राएलाच्या घराण्याबरोबर करीन तो हाच आहे.” “मी आपले नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यांमात ठेवीन व त्यांच्या हृदयावर मी ते लिहीन, कारण मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. नंतर परमेश्वरास ओळखा असे म्हणून पुढे प्रत्येक मनुष्य आपल्या शेजाऱ्याला किंवा प्रत्येक आपल्या भावाला शिकवणार नाही. कारण लहानापासून थोरापर्यंत मला ओळखतील.” असे परमेश्वर म्हणतो. “कारण मी त्यांच्या अन्यायांची त्यांना क्षमा करीन आणि मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो, जो परमेश्वर दिवसा प्रकाशण्यासाठी सूर्य देतो आणि रात्री चंद्र व तारे यांना प्रकाशण्याची तजवीज करतो. जो समुद्रास खवळतो या करीता त्याच्या लाटा गर्जतात त्यांना तो शांत करतो. सेनाधीश परमेश्वर असे त्याचे नाव आहे. तो असे म्हणतो. “जर या स्थिर गोष्टी माझ्या दृष्टीपुढून नष्ट झाल्या तर इस्राएलाचे वंशजही माझ्यासमोर सर्वकाळ राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.” परमेश्वर असे म्हणतो, जर फक्त उंचात उंच आकाशाचे मोजमाप करणे शक्य असेल, आणि जर फक्त पृथ्वीच्या खालचे पाये शोधून काढता येऊ शकतील, तर मीही इस्राएलाच्या सर्व वंशजांनी जे सर्व काही केले आहे त्यामुळे त्यांना नाकारीन, असे परमेश्वर म्हणतो. “पाहा असे दिवस येत आहेत की; असे परमेश्वर म्हणतो, परमेश्वरासाठी हनानेलाच्या बुरुजापासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंत हे नगर पुन्हा बांधले जाईल. मग त्यासाठी मापनसूत्र गारेबाच्या टेकडीपर्यंत नीट पुढे निघून जाईल आणि तेथून गवाथाकडे वळेल. प्रेतांचे व राखेचे पूर्ण खोरे आणि किद्रोन ओहोळापर्यंत पूर्वेकडील घोडेवेशीच्या कोपऱ्यापर्यंत सर्व शेते परमेश्वरास पवित्र होतील. ती पुन्हा कधीही उपटण्यात येणार नाहीत किंवा मोडून टाकणार नाहीत.”
यिर्मया 31:15-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह असे म्हणतात: “रामाह मधून आवाज ऐकू येत आहे, शोक आणि घोर आकांत, राहेल आपल्या लेकरांसाठी रडत आहे. ती सांत्वन पावण्यास नकार देते, कारण ते आता राहिले नाहीत.” परंतु याहवेह असे म्हणतात: “तुझा रुदनस्वर आणि तुझ्या डोळ्यातील अश्रू आता आवर, कारण तुझ्या कार्यास फलप्राप्ती होणार आहे,” याहवेह असे जाहीर करतात “ते शत्रूच्या देशातून परत येतील. तुझ्या वंशजासाठी आशा आहे,” याहवेह असे जाहीर करतात. तुझी मुले आपल्या देशात परत येतील. “मी एफ्राईमचे आक्रंदन निश्चितच ऐकले: ‘तुम्ही मला अनावर वासराला लावावी तशी शिस्त लावली आहे, आणि मी ही शिस्त ग्रहण केली आहे. मला पुन्हा माझ्या पूर्वस्थितीत आणा, म्हणजे मी पूर्ववत होईन, कारण तुम्ही याहवेह, माझे परमेश्वर आहात. मी भरकटल्यानंतर, मला पश्चात्ताप झाला; मला समज आल्यानंतर, मी दुःखातिशयाने ऊर बडवून घेतला. माझ्या तरुणपणाच्या दिवसात मी जे आचरण केले, त्यामुळे मी लज्जित व अपमानित झालो आहे.’ हा एफ्राईम माझा लाडका पुत्र नाही का, जे माझे लेकरू, मला अत्यंत सुखदायक? जरी मी बरेचदा त्याच्याविरुद्ध बोललो, तरी मला आताही त्याची आठवण येते. म्हणून माझ्या मनाला त्याची ओढ लागली आहे; मला त्याची अत्यंत दया येते.” असे याहवेह जाहीर करतात. “जाताना वाटेवर खुणा कर; दिशादर्शक लाव. तू गेलीस तो महामार्ग ध्यानात ठेव, त्या मार्गावर लक्ष ठेव. हे इस्राएली कुमारी, परत ये, तू आपल्या नगरांमध्ये परत ये. अगे विश्वासघातकी कन्ये, तू कुठवर भटकत राहणार? याहवेह पृथ्वीवर नवीन गोष्ट घडविणार आहेत— स्त्री पुरुषाकडे परत येईल.” सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: “मी जेव्हा बंदिवासातून त्यांना परत आणेन, तेव्हा यहूदीयामधील व त्यांच्या नगरांमधील लोक असे म्हणतील: हे समृद्ध नगरी, ‘हे पवित्र डोंगरा, याहवेह तुला आशीर्वादित करो’ मग यहूदीया नगरवासी—शेतकरी व कळप घेऊन फिरणारे मेंढपाळ सर्वच एकत्र नांदतील. मी थकलेल्यांना व मूर्छित झालेल्यांना ताजेतवाने व संतुष्ट करेन.” एवढ्यात मी जागा झालो व सभोवती पाहिले. माझी झोप अत्यंत सुखद होती. याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत जेव्हा लोकांच्या व गुरांच्या वंशजाचे मी इस्राएल व यहूदीयामध्ये रोपण करेन. जसे त्यांना उपटून टाकताना व विदीर्ण होतांना, जमीनदोस्त होतांना, नष्ट होतांना व विपत्ती येत असताना लक्षपूर्वक नजर ठेवून होतो, तर पुन्हा त्यांचे रोपण व उभारणेही लक्ष लावून बघेन,” असे याहवेह जाहीर करतात. “लोक त्या दिवसात पुन्हा म्हणणार नाहीत, ‘पालकांनी आंबट द्राक्षे खाल्ली, आणि मुलांचे दात आंबले.’ कारण प्रत्येकजण स्वतःच्या पापांमुळे मरेल; जो कोणी आंबट द्राक्षे खाईल—त्याचेच दात आंबतील. “असे दिवस येतील जेव्हा, इस्राएलच्या लोकांशी व यहूदीयाच्या लोकांशी मी एक नवीन करार करेन,” याहवेह म्हणतात. “मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले, तेव्हा मी त्यांच्याशी केलेल्या कराराप्रमाणे हा करार नसेल. मी जरी त्यांचा पती होतो, तरी त्यांनी माझा करार मोडला.” असे याहवेह जाहीर करतात. “परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा” याहवेह जाहीर करतात, “त्या वेळेनंतर मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन, आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन, मी त्यांचा परमेश्वर होईन, आणि ते माझे लोक होतील. कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही, किंवा ‘याहवेहला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही, कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण मला ओळखतील,” असे याहवेह जाहीर करतात. “मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.” याहवेह असे म्हणतात, दिवसा सूर्यप्रकाश द्यावा म्हणून ज्यांनी सूर्याला नियुक्त केले, व रात्री प्रकाश देण्यासाठी चंद्र व ताऱ्यांना आज्ञा दिली, गर्जना करणार्या लाटा उसळाव्यात म्हणून जे समुद्र ढवळतात; त्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह असे आहे: “जर हे नियम माझ्या नजरेपुढून नाहीसे झाले तरच माझ्यापुढे एक राष्ट्र म्हणून इस्राएलचे अस्तित्व समाप्त होईल.” याहवेह असे जाहीर करतात. याहवेह असे म्हणतात: “जर आकाशाचे मोजमाप करता आले असते व पृथ्वीच्या पायांचा थांग लावता आला असता, तर मी माझ्या इस्राएली लोकांच्या सर्व वंशजांना त्यांनी जे सर्व केले त्याबद्दल त्यांना नाकारले असते,” याहवेह जाहीर करतात. याहवेह जाहीर करतात, “असे दिवस येत आहेत, कोपर्यातील हनानेलच्या बुरुजापासून कोपर्याच्या वेशीपर्यंत या नगरीची पुनर्बांधणी होईल. आणि गारेबच्या टेकडीपासून गोआहपर्यंत मापनसूत्र विस्तारित केले जाईल. संपूर्ण खोरे जिथे प्रेते व राख फेकण्यात येत असे, व त्याचप्रमाणे किद्रोनच्या खोऱ्यापर्यंतची आणि तिथून पूर्वेकडील घोडवेशी पर्यंतची सर्व शेते याहवेहला पवित्र अशी होतील. या नगराचा पुन्हा कधीही पाडाव किंवा विध्वंस होणार नाही.”