YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 18:1-6 - Compare All Versions

यिर्मया 18:1-6 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

यिर्मयाला परमेश्वराकडून आलेले वचन ते आहे, ते म्हणाले: “उठ आणि कुंभाराच्या घरी जा, कारण मी तेथे तुला माझी वचने देईन.” म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि पाहा! तो कुंभार चाकावर काम करीत होता, पण जे मातीचे पात्र तो तयार करत होता ते त्याच्या हातात असतांनाच बिघडले, म्हणून त्याने आपले विचार बदलले आणि त्याच्या दृष्टीस चांगले वाटणारे त्याचे त्याने पुन्हा एक दुसरे पात्र तयार केले. तेव्हा परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले: परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएलाच्या घराण्यांनो, तुमच्याबरोबर या कुंभार सारखे वागण्यास मी सक्षम नाही काय? अहो, इस्राएलाच्या घराण्यांनो पाहा! जशी माती कुंभाराच्या हातात असती तसे तुम्ही माझ्या हातात आहात.

सामायिक करा
यिर्मया 18 IRVMAR

यिर्मया 18:1-6 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

याहवेहकडून यिर्मयाहला हे वचन प्राप्त झाले: “कुंभाराच्या घरी जा आणि तिथे मी तुला माझा संदेश देईन.” म्हणून मी कुंभाराच्या घरी गेलो, आणि तिथे तो आपल्या चाकावर काम करताना मला दिसला. परंतु तो जे मडके करीत होता, त्याच्या हातातील मातीचा आकार बिघडला; म्हणून त्याने त्याचे, त्याला योग्य वाटेल तसे दुसरे मडके बनविले. तेव्हा याहवेहचे वचन माझ्याकडे आले. ते म्हणाले, “हे इस्राएला, या कुंभाराने आपल्या मातीचे केले तसे मला तुझे करता येणार नाही काय? कुंभाराच्या हातात माती असते तसे इस्राएला, तुम्ही माझ्या हातात आहात,” असे याहवेह जाहीर करतात.

सामायिक करा
यिर्मया 18 MRCV

यिर्मया 18:1-6 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

परमेश्वरापासून जे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे : “ऊठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन.” मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा तो चाकावर काम करीत होता. कुंभार मातीचे पात्र घडत होता; ते त्याच्या हातात असतानाच बिघडून गेले, मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडले. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले : “हे इस्राएलाच्या घराण्या, ह्या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, कुंभाराच्या हातात माती असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात.

सामायिक करा
यिर्मया 18 MARVBSI