YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 10:1-13

यिर्मया 10:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे इस्राएलाच्या घराण्या, परमेश्वर तुम्हांला जे वचन सांगतो, ते ऐका; परमेश्वर असे म्हणतो, “राष्ट्रांचे संप्रदाय शिकू नका; आकाशातील उत्पातांनी घाबरू नका; राष्ट्रे तर त्यांनी घाबरतात. लोकांचे विधी व्यर्थ आहेत; अरण्यातून कोणी तोडून आणलेले ते काष्ठच होय, ते कारागिराच्या हातच्या हत्याराने केलेले काम आहे. तो सोन्यारुप्याने ते भूषित करतो व हालू नये म्हणून हातोड्याने खिळे ठोकून ते घट्ट बसवतो. त्या मूर्ती बागेतल्या बुजगावण्यासारख्या आहेत; त्यांना बोलता येत नाही, त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्यांना चालता येत नाही; त्यांना भिऊ नका; कारण त्यांच्याने काही वाईट करवत नाही, व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही.” हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीच नाही; तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे. हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही? हे तुला साजते; राष्ट्रांतील सर्व ज्ञात्यांत, त्यांच्या सर्व राज्यांत तुझ्यासमान कोणीच नाही. ते एकंदर सर्व पशुवत व मूर्ख आहेत; मूर्तीपासून घ्यावयाचा बोध म्हटला म्हणजे काष्ठरूप! तार्शीशाहून आणलेले रुप्याचे पत्रे व उफाजचे सोने ह्यांचे कारागिराने केलेले, सोनाराच्या हाताने घडलेले काम त्या आहेत, त्यांना निळा, जांभळा पोशाख चढवतात; त्या सगळ्या कुशल कारागिरांच्या हातचे काम होत. तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. तुम्ही त्यांना हे सांगा की, “ज्या देवांनी आकाश व पृथ्वी केली नाही ते पृथ्वीवरून, आकाशाखालून नष्ट होतील.” त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली, त्याने आपल्या बुद्धीने आकाश पसरले. तो आपला शब्द उच्चारतो तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो; तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवतो; तो पावसासाठी विजा सिद्ध करतो आणि आपल्या भांडारातून वायू बाहेर काढतो.

सामायिक करा
यिर्मया 10 वाचा

यिर्मया 10:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वर जे वचन तुम्हास घोषीत करीत आहे ते ऐका. परमेश्वर असे म्हणतो, “देशांचे मार्ग शिकू नका. आणि आकाशातील चिंन्हाना घाबरुन जाऊ नका, कारण त्यामुळे राष्ट्रे भयभीत असतात. त्या लोकांच्या चालीरीती अर्थशून्य आहेत. कारण कोणी जंगलातून झाड तोडतो, असे ते कुऱ्हाडीने केलेले कारागीराच्या हाताचे काम आहे. नंतर ते त्यांना चांदीसोन्याने त्यांना सजवतात. ते खाली पडू नयेत म्हणून हातोड्याने व खिळ्याने ते घट्ट बसवितात. अशा मूर्ती काकडीच्या मळ्यातील बुजगावण्यासारख्या आहेत. त्या बोलू शकत नाहीत वा चालू शकत नाहीत. लोकांसच त्या वाहून न्याव्या लागतात. तेव्हा त्यांना घाबरु नका. त्या मूर्ती तुमचे वाईटही करु शकत नाहीत व चांगलेही करु शकत नाहीत.” परमेश्वर तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तू महान आहेस आणि तुझ्या नावातच सामर्थ्य आहे. तुला कोण भिणार नाही, हे राष्ट्राच्या राजा? कारण तू त्या योग्यतेचा आहेस, कारण राष्ट्रांच्या सर्व ज्ञान्यांमध्ये आणि त्यांच्या सर्व राज्यांमध्ये तुझ्यासारखा कोणी नाही. ते सर्व पशूसारखे आणि मूर्ख आहेत, दीड दमडीच्या लाकडाच्या मूर्तींचे अनुयायी आहेत. ते लोक तार्शीशाहून ठोकून आणलेली चांदी आणि उफाजहून आणलेले सोने, कारागिराच्या व सोनाराच्या हातचे अशे ते काम आहे. ते निळ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात शहाणे लोक असे देव तयार करतात. पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. तोच जिवंत आणि सार्वकालीक राजा आहे. पृथ्वी त्याच्या क्रोधाने कंपन पावते आणि त्याचा कोप राष्ट्रे सहन करु शकत नाहीत. परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांस पुढील संराष्ट्र द्या. ‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची आणि स्वर्गाची निर्मिती केली नाही. ते स्वर्गांतून आणि पृथ्वीवरुन नाहीसे होतील. ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याने जग निर्माण केले आपल्या समंजसपणाच्या आधारे आकाश पांघरले. त्याच्या वाणीने आकाशात पाण्याच्या गडगडाट होतो, आणि तो पृथ्वीच्या शेवटापासून धुके वर चढवतो. तो पावसासाठी विजा निर्माण करतो, आणि आपल्या भांडारातून वारा बाहेर काढतो.

सामायिक करा
यिर्मया 10 वाचा

यिर्मया 10:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे इस्राएलच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका. याहवेह असे म्हणतात: “इतर राष्ट्रांचे मार्ग शिकू नका जरी त्यांच्यामुळे इतर राष्ट्रे भयभीत होतात, तरी आकाशाच्या चिन्हांनी तुम्ही भयभीत होऊ नका. कारण लोकांच्या प्रथा व्यर्थ आहेत; ते जंगलातील एक लाकूड कापून आणतात, आणि एक कारागीर हातातील छेनीने त्यास आकार देतो. ते त्याला सोने आणि चांदीने सजवितात; ती एका जागी स्थिर रहावी, पडू नये म्हणून खिळे व हातोडा यांनी ती ठोकून घट्ट बसवितात. ते जणू काही काकडीच्या मळ्यातील बुजगावणेच, या मूर्तीला बोलता येत नाही; तिला तर उचलून न्यावे लागते कारण तिला चालता येत नाही. त्यांना घाबरू नकोस; त्या काहीही इजा करू शकत नाही तुमचे काही भले सुद्धा करत नाही.” हे याहवेह, तुमच्यासारखे कोणीही नाही. कारण तुम्ही महान आहात, आणि तुमचे नाव अति सामर्थ्यशाली आहे. हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे भय नाही असा कोण आहे? अशा श्रद्धेच्या योग्य केवळ तुम्हीच आहात, सर्व राष्ट्रातील सुज्ञ पुढाऱ्यांमध्ये आणि जगातील सर्व राज्यांमध्ये तुमच्यासारखे दुसरे कोणीच नाही. लाकडाच्या व्यर्थ मूर्तींद्वारे ज्यांना शिक्षण मिळते, ते सर्व निर्बुद्ध व मूर्ख आहेत; ते तार्शीशहून चांदीचे पत्रे आणि उफाजहून सोन्याचे पत्रे आणून कुशल कारागीर व सोनारांकडून मूर्ती घडवून घेतात. मग त्यावर ते निळी व जांभळी वस्त्रे चढवितात— हे सर्व निष्णात कारागिरांनी तयार केलेले असते. परंतु याहवेह हेच खरे परमेश्वर आहेत; ते जिवंत परमेश्वर आहेत, ते सनातन राजा आहेत. जेव्हा ते क्रोधित होतात, सर्व पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या प्रकोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. “त्यांना हे सांग: ‘ही दैवते, ज्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली नाही, ती या पृथ्वीवरून आणि आकाशाच्या खालून नष्ट होतील.’ ” परंतु परमेश्वराने त्यांच्या सामर्थ्याने पृथ्वीची निर्मिती केली; संपूर्ण विश्वाची प्रस्थापना त्यांच्या सुज्ञतेने केली आणि त्यांच्या बुद्धीने आकाश विस्तीर्ण केले. जेव्हा ते गर्जना करतात, तेव्हा आकाशातील मेघगर्जना करतात; ते मेघांना पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत उभारतात. ते विजा आणि पाऊस पाठवितात आणि त्यांच्या भांडारातून वारा बाहेर काढतात.