YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 6:36-40

शास्ते 6:36-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग गिदोन देवाला बोलला, “जसे मला सांगितले तसा जर तू माझ्या हाताने इस्राएलांना तारणार असलास; तर पाहा, मी खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो; जर लोकरीवर मात्र दहिवर पडेल आणि सर्व भूमी कोरडी राहील, तर मला कळेल की जसे मला सांगितले, तसा तू माझ्या हाताने इस्राएलाला तारशील.” नंतर तसे झाले; म्हणजे सकाळी जेव्हा तो उठला, तेव्हा त्याने ती लोकर दाबून तिच्यातून पिळून वाटीभर पाणी काढले. मग गिदोन देवाला बोलला, “तू माझ्यावर रागावू नको, मी आणखी एक वेळेस बोलतो; आता केवळ या वेळेस या लोकरीच्या व्दारे एक वेळ मी परीक्षा पाहतो: ही लोकर तेवढी कोरडी राहून बाकी अवघ्या जमिनीवर दहिवर पडेल असे कर.” तेव्हा त्या रात्री देवाने तसे केले म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली आणि संपूर्ण भूमीवर दहिवर पडले.

सामायिक करा
शास्ते 6 वाचा

शास्ते 6:36-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग गिदोन देवाला म्हणाला, “तू आपल्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते इस्राएलाचा उद्धार करणार असलास, तर पाहा, मी ह्या खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो; रात्री फक्त तिच्यावर दहिवर पडून बाकी सर्व जमीन कोरडी राहिली, तर तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते तू इस्राएलाचा उद्धार करणार आहेस हे मला कळेल.” तसाच प्रकार घडून आला. दुसर्‍या दिवशी पहाटे उठून त्याने ती लोकर दाबून तिच्यातले दहिवर पिळून एक वाटीभर पाणी काढले. मग गिदोन देवाला म्हणाला, “माझ्यावर रागावू नकोस; मला आणखी एकदाच बोलू दे. कृपया ह्या लोकरीने मला आणखी एकदाच प्रतीती पाहू दे. ह्या खेपेस लोकर तेवढी कोरडी राहू दे आणि सार्‍या जमिनीवर दहिवर पडू दे.” त्या रात्री देवाने तसेच केले; म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली व सगळ्या जमिनीवर दहिवर पडले.

सामायिक करा
शास्ते 6 वाचा