शास्ते 3:1-4
शास्ते 3:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
इस्राएल लोकांस कनान देशांतील लढायांचा अनुभव नव्हता त्यांची परीक्षा पाहण्यासाठी परमेश्वराने काही राष्ट्रे देशात राहू दिली. इस्राएलाच्या नव्या पिढ्यांना, ज्यांना पूर्वी त्या लढायांविषयी काहीच माहीत नव्हते त्यांना तिचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली ती ही; पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बाल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या घाटापर्यंत लबानोन डोंगरात राहणारे हिव्वी. इस्राएलाच्या पूर्वजांना मोशेद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते.
शास्ते 3:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इस्राएलांपैकी ज्यांना कनान देशातील युद्धांचा अनुभव नव्हता त्यांना कसास लावण्यासाठी आणि इस्राएल लोकांच्या पिढ्यांपैकी ज्यांना युद्धाचा मुळीच अनुभव नव्हता त्यांना त्याचा अनुभव तरी घडावा व युद्धकलेचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली ती ही : पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतात राहणारे हिव्वी. परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्राएलाच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा त्यांच्याकरवी घेण्यासाठी परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते.