इस्राएलांपैकी ज्यांना कनान देशातील युद्धांचा अनुभव नव्हता त्यांना कसास लावण्यासाठी आणि इस्राएल लोकांच्या पिढ्यांपैकी ज्यांना युद्धाचा मुळीच अनुभव नव्हता त्यांना त्याचा अनुभव तरी घडावा व युद्धकलेचे शिक्षण मिळावे म्हणून परमेश्वराने जी राष्ट्रे राहू दिली ती ही : पलिष्ट्यांचे पाच सरदार आणि सर्व कनानी, सीदोनी आणि बआल-हर्मोन डोंगरापासून हमाथाच्या खिंडीपर्यंत लबानोन पर्वतात राहणारे हिव्वी. परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्राएलाच्या पूर्वजांना दिलेल्या आज्ञा ते पाळतात की नाही ह्याची परीक्षा त्यांच्याकरवी घेण्यासाठी परमेश्वराने त्यांना मागे ठेवले होते.
शास्ते 3 वाचा
ऐका शास्ते 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: शास्ते 3:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ