शास्ते 11:1-28
शास्ते 11:1-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इफ्ताह गिलादी हा एक पराक्रमी वीर होता; तो वेश्यापुत्र असून त्याचा बाप गिलाद होता. गिलादाच्या बायकोलाही मुलगे झाले; हे तिचे मुलगे मोठे झाल्यावर त्याला म्हणाले, “तू परस्त्रीचा मुलगा असल्यामुळे आमच्या वडिलांच्या घराण्यातील वतनात तुला वाटा मिळणार नाही.” असे म्हणून त्यांनी त्याला हाकून दिले. तेव्हा इफ्ताह आपल्या बांधवांच्या भीतीने पळून गेला आणि टोब देशात जाऊन राहिला. तेथे रिकामटेकडे लोक त्याला मिळाले आणि ते त्याच्याबरोबर वावरू लागले. काही दिवसांनी अम्मोनी लोकांनी इस्राएलाशी युद्ध पुकारले. अम्मोनी लोक इस्राएलाशी लढू लागले तेव्हा गिलाद येथील वडील जन इफ्ताहाला आणण्यासाठी टोब देशी गेले. ते इफ्ताहाला म्हणाले, “चला, आमचे सेनापती व्हा म्हणजे आपण अम्मोनी लोकांशी युद्ध करू.” इफ्ताह गिलादाच्या वडील जनांना म्हणाला, “तुम्ही माझा द्वेष करून मला आपल्या बापाच्या घरातून हाकून दिले होते ना? आणि आता कशाला आलात? संकटात पडलात म्हणून?” गिलादाचे वडील जन इफ्ताहाला म्हणाले, “होय, म्हणून तर आम्ही आता तुमच्याकडे आलो आहोत; तुम्ही आमच्याबरोबर चला, आणि अम्मोनी लोकाशी युद्ध करा, म्हणजे तुम्ही आम्हा सर्व गिलादकरांचे प्रमुख व्हाल.” गिलादाच्या वडील जनांना इफ्ताह म्हणाला, “अम्मोनी लोकांशी युद्ध करायला तुम्ही मला स्वदेशी परतवले आणि परमेश्वराने त्यांना माझ्या हाती दिले तर मीच तुमचा प्रमुख राहीन काय?” गिलादाचे वडील जन इफ्ताहाला म्हणाले, “परमेश्वर तुमच्या-आमच्यामध्ये साक्षी आहे; तुम्ही म्हणता तसे आम्ही अवश्य करू.” मग इफ्ताह गिलादाच्या वडील जनांबरोबर गेला; लोकांनी त्याला आपला प्रमुख व सेनापती नेमले. तेव्हा इफ्ताहाने आपले सगळे म्हणणे मिस्पा येथे परमेश्वरासमक्ष परत बोलून दाखवले. पुढे इफ्ताहाने अम्मोन्यांच्या राजाकडे जासूद पाठवून विचारले, “माझ्याकडे यायला व माझ्या देशाशी लढायला तुझे आणि माझे कोठे बिनसले आहे?” अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या जासुदांना म्हटले, “इस्राएल लोक मिसर देशाहून आले तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक व यार्देन ह्या नद्यांपर्यंतचा माझा प्रदेश त्यांनी हिरावून घेतला; आता तो मुकाट्याने परत करा.” इफ्ताहाने अम्मोन्यांच्या राजाकडे पुन्हा जासुदांच्या हाती निरोप पाठवला, तो असा : इफ्ताह म्हणतो, “इस्राएलाने मवाबाचा देश घेतला नाही किंवा अम्मोनी लोकांचाही देश घेतला नाही, पण ते मिसर देशाहून निघाले आणि रानातून कूच करून तांबड्या समुद्रावरून कादेश येथे आले; तेव्हा त्यांनी जासुदांच्या हाती अदोमाच्या राजाला सांगून पाठवले की, कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून जाऊ दे; पण अदोमाच्या राजाने आमचे ऐकले नाही; तसेच त्यांनी मवाबाच्या राजाला सांगून पाठवले, पण तोही आमचे ऐकायला तयार नव्हता, म्हणून इस्राएल कादेश येथे वस्ती करून राहिले. त्यानंतर त्यांनी रानातून फिरत फिरत अदोम व मवाब ह्या देशांना वळसा घालून मवाबाच्या पूर्वेकडून येऊन आर्णोन नदीपलीकडे तळ दिला. पण ते मवाबाच्या हद्दीत शिरले नाहीत; कारण आर्णोन नदी ही मवाबांची सरहद्द होती. मग अमोर्यांचा राजा, म्हणजे हेशबोनाचा राजा सीहोन, ह्याच्याकडे इस्राएलांनी जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, ‘कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून स्वस्थानी जाऊ दे.’ पण सीहोनाला इस्राएलाची खात्री नसल्यामुळे त्याने त्याला आपल्या हद्दीतून जाऊ दिले नाही; उलट त्याने आपले सर्व लोक जमवून याहस येथे तळ देऊन इस्राएलाशी युद्ध केले. तरीपण इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्राएलाच्या हाती दिले व त्यांनी त्यांचा पराभव केला. अशा प्रकारे त्या देशाचे रहिवासी अमोरी ह्यांचा सारा मुलुख इस्राएलांनी हस्तगत केला. अर्थात आर्णोन नदीपासून यब्बोक नदीपर्यंतचा आणि रानापासून यार्देन नदीपर्यंतचा अमोर्यांचा सर्व देश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने आपली प्रजा इस्राएल हिच्याकरता अमोर्यांना घालवून दिले आणि आता तू त्यांच्या प्रदेशावर हक्क गाजवायला बघतोस काय? तुझा देव कमोश ह्याने तुला दिलेल्या वतनावरच तू हक्क गाजवू नये काय? आमचा देव परमेश्वर ह्याने ज्यांना आमच्यासाठी हाकून लावले त्यांचे वतन आमचेच राहील. मवाबाचा राजा सिप्पोर ह्याचा मुलगा बालाक ह्याच्यापेक्षा तू श्रेष्ठ आहेस काय? तो इस्राएलाशी कधी भांडला काय? तो कधी लढला काय? हेशबोन व त्याची उपनगरे, अरोएर व त्याची उपनगरे आणि आर्णोनतीरीची सर्व नगरे ह्यांत आज तीनशे वर्षे इस्राएल वस्ती करून आहे, तर ह्या अवधीत तुम्ही ती परत का मिळवली नाहीत? मी तुझा काही गुन्हा केला नाही, तरी माझ्याशी लढून तू माझ्यावर अन्याय करत आहेस, न्यायाधीश परमेश्वर हा इस्राएल लोक व अम्मोनी लोक ह्यांचा आज न्याय करो.” इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाला पाठवलेला हा निरोप त्याने जुमानला नाही.
शास्ते 11:1-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
गिलादी इफ्ताह पराक्रमी वीर होता, परंतु तो वेश्येचा पुत्र होता, आणि गिलाद त्याचा पिता होता. गिलादाच्या पत्नीने त्यापासून दुसऱ्या पुत्रांना जन्म दिला, आणि जेव्हा त्या स्त्रीचे पुत्र मोठे झाले, तेव्हा त्यांनी इफ्ताहाला घालवून दिले आणि म्हटले, “आमच्या वडिलाच्या घरी तुला वतन प्राप्त होणार नाही; कारण तू दुसऱ्या स्त्रीचा पुत्र आहेस.” यास्तव इफ्ताह आपल्या भावांपुढून पळाला, आणि टोब देशात जाऊन राहिला; तेव्हा रिकामटेकडी माणसे इफ्ताहाजवळ मिळून त्याच्याबरोबर चालली. मग काही वेळानंतर असे झाले की अम्मोनी लोकांनी इस्राएलाशी लढाई केली. जेव्हा अम्मोनी लोक इस्राएलाशी लढत असताना असे झाले की गिलादाचे वडील मंडळ इफ्ताहाला टोब देशातून परत आणायला गेले. तेव्हा ते इफ्ताहाला म्हणाले, “तू येऊन आमचा सेनापती हो, कारण आम्ही अम्मोनी लोकांशी लढत आहो.” इफ्ताह गिलादाच्या वडीलजनांना बोलला, “तुम्ही माझा द्वेष करून माझ्या पित्याच्या घरातून मला घालवले की नाही? तर आता तुम्ही संकटात असता, माझ्याजवळ कशाला आला?” तेव्हा गिलादाच्या वडीलांनी इफ्ताहाला म्हटले, “आम्ही आता तुझ्याकडे यासाठी आलो आहो की, तू आमच्याबरोबर येऊन अम्मोनी लोकांशी लढाई करावी, मग तू गिलादातल्या सर्व राहणाऱ्यांवर आमचा अधिकारी असा होशील.” तेव्हा इफ्ताह गिलादाच्या वडीलास म्हणाला, “जर तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढायास माघारी नेले, आणि परमेश्वराने त्यांना माझ्या स्वाधीन केले, तर मी तुमचा अधिकारी असा होईन काय?” तेव्हा गिलादातील वडीलजन इफ्ताहाला बोलले, “जर तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही करीत नाही, तर आपल्यामध्ये परमेश्वर साक्षी होवो.” मग इफ्ताह गिलादाच्या वडीलांबरोबर गेला, आणि त्या लोकांनी त्यास आपल्यावर अधिकारी व सेनापती असे करून ठेवले; तेव्हा इफ्ताह आपली सर्व वचने मिस्पात परमेश्वरासमोर बोलला. मग इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाजवळ वकील पाठवून म्हटले, “माझ्यात आणि तुझ्यात काय भांडण आहे? तू माझ्याशी लढावयास सैन्य घेऊन माझ्या देशात आमचा देश घेण्यास येत आहेस?” तेव्हा अम्मोनी लोकांचा राजा इफ्ताहाच्या वकिलांना बोलला, “कारण की जेव्हा इस्राएल मिसरातून आले, तेव्हा त्यांनी आर्णोन नदीपासून याब्बोक व यार्देन या नद्यापर्यंत माझा देश होता तो त्यांनी हिरावून घेतला; तर आता तो देश शांतीने परत दे.” तेव्हा इफ्ताहाने पुन्हा दुसरे वकील अम्मोनी लोकांच्या राजाजवळ पाठवले. आणि त्यास म्हटले, इफ्ताह असे सांगतो की इस्राएलाने मवाबाचा देश व अम्मोनी लोकांचा देश घेतला नाही. परंतु जेव्हा इस्राएल मिसरातून निघाले, तेव्हा ते सूफ समुद्राजवळच्या रानांतून तांबड्या समुद्रावरून कादेश येथे आले. मग इस्राएलांनी अदोमी राजाजवळ वकील पाठवून म्हटले, “तू कृपा करून आपल्या देशावरून मला जाऊ दे,” परंतु अदोमी राजाने ऐकले नाही, आणि मवाबी राजाजवळही पाठवले, परंतु तोसुद्धा मान्य झाला नाही; यास्तव इस्राएल कादेशात राहिले. आणि त्यांनी रानात चालून अदोम देश व मवाब देश यांना फेरी घातली. असे सूर्याच्या उगवतीकडून मवाब देशास येऊन आर्णोनच्या काठी तळ दिला परंतु ते मवाब सीमेत गेले नाहीत; कारण आर्णोन मवाबाची सीमा आहे. तेव्हा इस्राएलानी अमोऱ्यांचा राजा सीहोन याजवळ, म्हणजे हेशबोनातल्या राजाजवळ वकील पाठवले, “आणि इस्राएलांनी त्यास म्हटले, तू कृपेने आपल्या देशावरून आम्हांला आमच्या ठिकाणापर्यंत जाऊ दे.” पण सीहोनाला इस्राएलावर विश्वास नव्हता म्हणून आपल्या सीमेवरून जाऊ देण्याविषयी तयार झाला नाही, परंतु सीहोनाने आपले सर्व लोक मिळवून आणि याहाज गावात तळ देऊन इस्राएलाशी लढाई केली. तेव्हा इस्राएलाचा देव परमेश्वर याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्राएलाच्या हाती दिले; यास्तव इस्राएलानी त्यांचा नाश केला, आणि त्या देशात राहिलेले जे अमोरी त्यांचा सर्व देश वतन करून घेतला. असे त्यांनी आर्णोनपासून याब्बोकपर्यंत आणि रानापासून यार्देनेपर्यंत अमोऱ्यांचे सर्व प्रांत वतन करून घेतले. तर आता इस्राएलाचा देव परमेश्वर याने आपले लोक इस्राएल याच्यापुढून अमोऱ्यांना घालवले; आणि आता तू त्यांच्या देशाच्या मालमत्तेचा ताबा घेतोस काय? तुझा देव कमोश तुला जे वतन देतो, ते तू ठेवशील की नाही? तसे आमचा देव परमेश्वर याने ज्या लोकांस घालवून दिले त्यांच्या सर्व वतनावर आमचा ताबा असावा. तर आता सिप्पोरपुत्र बालाक मवाब राजा यापेक्षा तू चांगला आहेस की काय? इस्राएलाशी वाद करण्यास त्याने आव्हान दिले काय? त्याने त्याच्याशी कधी लढाई पुकारली काय? जेव्हा इस्राएल हेशबोनात व त्याच्या गावात, आणि अरोएर व त्याच्या गावांत, आणि आर्णोनच्या तीरावरल्या सर्व नगरांत तीनशे वर्षे राहिले, त्या वेळेमध्ये तुम्ही ती का काढून घेतली नाहीत. मी तर तुझा काही अपराध केला नाही, परंतु तू माझ्याशी लढण्याने माझे वाईट करतोस; परमेश्वर जो न्यायाधीश तो आज इस्राएली लोक व अम्मोनी लोक यांमध्ये न्याय करो. तथापि अम्मोनी लोकांच्या राजाने आपल्याजवळ इफ्ताहाने जी चेतावणी पाठवली ती नाकारली.
शास्ते 11:1-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
गिलआदी इफ्ताह हा एक महान योद्धा होता. त्याच्या पित्याचे नाव गिलआद; त्याची आई एक वेश्या होती. गिलआदाच्या पत्नीने सुद्धा त्याच्या पुत्रांना जन्म दिला आणि जेव्हा ते मोठे झाले, तेव्हा त्यांनी इफ्ताहाला हाकलून दिले. ते त्याला म्हणाले, “आमच्या पित्याच्या वतनातून तुला काहीही मिळावयाचे नाही, कारण तू दुसर्या स्त्रीचा पुत्र आहेस.” म्हणून इफ्ताह आपल्या भावांपासून पळून गेला आणि तोब या देशात जाऊन राहिला. लवकरच त्याने गुंड लोकांची टोळी जमविली. त्या टोळीतले लोक त्याचे अनुयायी बनले व त्याच्याबरोबर राहू लागले. काही वेळानंतर, अम्मोनी लोक इस्राएली लोकांविरुद्ध युद्ध करू लागले. जेव्हा अम्मोनी इस्राएल लोकांशी लढत होते, तेव्हा गिलआदाचे वडीलजन इफ्ताहाला आणण्यास तोब येथे गेले. त्यांनी इफ्ताहाला म्हटले, “ये आणि आमचा सेनापती हो, म्हणजे आपण अम्मोनी लोकांविरुद्ध युद्ध करू.” गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताह म्हणाला, “तुम्ही माझा द्वेष केला नाही का आणि मला माझ्या वडिलांच्या घरातून हाकलून लावले होते ना? जेव्हा तुम्ही संकटात आहात तेव्हा आता तुम्ही मजकडे का आलात?” गिलआदाच्या वडीलजनांनी इफ्ताहाला म्हटले, “आम्ही तुझ्याकडे यासाठी आलो आहेत की; तू आमच्यासोबत अम्मोनी लोकांविरुद्ध युद्ध करण्यास ये आणि गिलआद मधील रहिवाशांचा प्रमुख हो.” गिलआदाच्या वडीलजनांना इफ्ताहाने उत्तर दिले, “समजा तुम्ही मला अम्मोनी लोकांशी लढण्यासाठी परत नेले आणि याहवेहने ते मला दिले तर मी खरोखर तुमचा प्रमुख होईन काय?” गिलआदाच्या वडिलांनी इफ्ताहाला उत्तर दिले, “याहवेह आमचे साक्षी आहेत; तुम्ही सांगाल तसे आम्ही नक्कीच करू.” तेव्हा इफ्ताह गिलआदाच्या वडिलांसोबत गेला आणि लोकांनी त्याला त्यांचा प्रमुख व सेनापती केले. आणि त्याने मिस्पाह येथे याहवेहसमोर आपले सर्व शब्द पुन्हा सांगितले. नंतर इफ्ताहाने अम्मोनी राजाकडे दूत पाठवून प्रश्न केला: “तुला माझ्याविरुद्ध काय तक्रार आहे की तू माझ्या देशावर हल्ला केला?” अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाच्या दूतांना उत्तर दिले, “जेव्हा इस्राएली लोक इजिप्त देशामधून बाहेर आले, तेव्हा आर्णोन नदीपासून यब्बोक आणि यार्देन या नद्यांपर्यंतचा सर्व मुलूख त्यांनी हिरावून घेतला होता. आता तो शांततेने परत केला जावा.” इफ्ताहाने अम्मोनी राजाकडे दूतांना परत पाठवले म्हणाला: “इफ्ताह असे म्हणतो: इस्राएलने मोआब किंवा अम्मोनी लोकांची भूमी घेतली नाही. परंतु जेव्हा इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले, त्यांनी तांबडा समुद्र ओलांडला आणि कादेश या ठिकाणी आले. तेव्हा इस्राएली लोकांनी एदोमाच्या राजाकडे दूतांना पाठवून म्हटले, ‘आम्हाला तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या,’ परंतु एदोमाच्या राजाने ऐकले नाही. तसाच त्यांनी मोआबाच्या राजाकडे निरोप पाठविला आणि त्यानेही नकार दिला. म्हणून इस्राएली लोक कादेश येथेच राहिले. “नंतर त्यांनी एदोम आणि मोआब या देशांना वेढा घालून रानातून आणि पूर्वेकडील सीमेने प्रवास करीत मोआबाच्या सीमेच्या पलीकडे आर्णोन नदीजवळ तळ दिला. परंतु त्यांनी मोआबाच्या सीमेत प्रवेश केला नाही, कारण आर्णोन ही मोआबाची सीमा होती. “नंतर इस्राएलने अमोर्यांचा राजा सीहोनकडे दूतांना पाठविले. जो त्यावेळी हेशबोन येथे राज्य करीत होता आणि त्याला म्हटले, ‘आम्हाला आमच्या स्वस्थानी जाण्यासाठी तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या.’ त्यांना त्याच्या सीमेतून जाऊ द्यावे असा विश्वास सीहोन राजाने इस्राएलवर ठेवला नाही. त्याने आपले सर्व सैन्य गोळा केले आणि याहसाह येथे तळ दिला आणि इस्राएलाशी युद्ध केले. “नंतर याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने सीहोन व त्याचे सर्व सैन्य इस्राएलाच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांचा पराभव केला. त्या देशात राहणार्या अमोरी लोकांचा सर्व देश इस्राएलने घेतला, आर्णोन ते यब्बोकपर्यंत आणि वाळवंटापासून यार्देनपर्यंत अमोर्यांचा सर्व प्रदेश काबीज केला. “याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराने आपल्या इस्राएली लोकांपुढून अमोर्यांना घालवून टाकले, तर ते परत मागण्याचा तुला कोणता अधिकार आहे? तुझे दैवत कमोशने तुला काही वतन दिले, तर ते तू आपल्या ताब्यात ठेवणार नाहीस का? तसेच याहवेह आमचे परमेश्वर आम्हाला जे वतन म्हणून देत आहे, ते आम्ही आमच्याच ताब्यात ठेवू. सिप्पोरचा पुत्र मोआबाचा राजा बालाकहून आपण श्रेष्ठ आहोत, असे तुला वाटते काय? त्याने इस्राएलशी कधी भांडण केले का किंवा त्यांच्याशी त्याने युद्ध केले काय? तीनशे वर्षे इस्राएलने हेशबोन, अरोएर, आजूबाजूच्या वसाहती आणि आर्णोनच्या बाजूची सर्व नगरे ताब्यात घेतली. त्या काळात तुम्ही त्यांना पुन्हा का घेतले नाही? मी तुझ्याविरुद्ध काही अपराध केलेला नाही, उलट तूच माझ्याशी लढण्यासाठी येऊन माझ्यावर अन्याय करीत आहेस. याहवेह जे न्यायी आहेत, ते इस्राएली लोक व अम्मोनी लोक यांच्यामध्ये आज न्याय करोत.” अम्मोन्यांच्या राजाने इफ्ताहाने पाठविलेल्या संदेशाकडे अजिबात लक्ष दिले नाही.