याकोब 4:6-8
याकोब 4:6-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो.” म्हणून देवाच्या अधीन रहा; आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल. तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा.
याकोब 4:6-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.” तुम्ही स्वतः परमेश्वराच्या अधीन व्हा. सैतानाचा विरोध करा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल; तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत.
याकोब 4:6-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.
याकोब 4:6-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देवाची कृपा तर अधिक प्रमाणात मिळते. म्हणून धर्मशास्त्र म्हणते, ‘देव गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो आणि नम्र लोकांवर कृपा करतो’. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो, पापी जनहो, हात स्वच्छ करा, अहो, ढोंगी लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा.