याकोब 2:25-26
याकोब 2:25-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तसेच राहाब वेश्या हिनेदेखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसर्या वाटेने लावून दिले; ह्यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय? म्हणून जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.
याकोब 2:25-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तसेच राहाब वेश्येने जेव्हा जासुसांना आत घेतले व दुसर्या वाटेने पाठवून दिले, तेव्हा ती कृतीनी नीतिमान ठरली नाही काय? कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे त्याचप्रमाणे कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे.
याकोब 2:25-26 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याचप्रमाणे, राहाब वेश्या जिने हेरांना राहण्यासाठी जागा दिली आणि त्यांना दुसर्या मार्गाने पाठवून दिले यात ती तिच्या कृत्यामुळे नीतिमान ठरली नाही का? जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.
याकोब 2:25-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तसेच, राहाब वेश्या हिनेदेखील इस्राएली जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसऱ्या वाटेने निघून जाण्यास मदत केली, ह्यात ती कृतीने नीतिमान ठरली नाही काय? तर मग जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे, तसा विश्वासही कृतींवाचून निर्जीव आहे.